Children's Day Wishes Marathi: आज १४ नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस होय. या दिवशी बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते आणि मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत असत. मुलांप्रती असलेले त्यांचे प्रेम आणि आपुलकी यामुळे त्यांचा वाढदिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जाऊ लागला. बालपण खूप खास आहे आणि ते बालपणीचे दिवस लक्षात ठेवा आणि सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा द्या.
“बालपण म्हणजे मस्तीत रमलेले दिवस,
हसत-खेळत घालवलेले क्षणांचे संचित.
सर्व लहानग्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“लहान मुलं म्हणजे आनंदाचे झरे,
त्यांच्या हास्याने फुलते आयुष्य सारे.
बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
“बालपणातली निरागसता आणि खेळ हा जीवनाचा खरा आनंद आहे,
प्रत्येक मुलाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
जगातील अशा काही गोष्टी आहेत
ज्या विकत घेता येत नाही
त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला आपल्या जगातील
या चिमुकल्यांच्या आनंदासाठी
एक सुरक्षित जग बनवूया.
बालदिनाच्या शुभेच्छा
मुलंही देवाघरची फुलं
ते आनंद पसरवतात आणि सुख देतात.
त्यांच्यावर भरपूर प्रेम करा
नाजूक हातांनी सांभाळा
बालदिनाच्या शुभेच्छा
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण,
बालपणीच्या आठवणीत हरवते मन,
कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण,
बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही.
बालदिवस आनंदाने साजरा करा
मुलांना भरपूर प्रेम द्या.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण,
बालपणीच्या आठवणीत हरवते मन,
कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण,
बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही.
बालदिवस आनंदाने साजरा करा
मुलांना भरपूर प्रेम द्या.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुलं म्हणजे पाखरांची चपळता,
मुलं म्हणजे पाटेची सौम्य उज्ज्वलता
मुलं म्हणजे झऱ्याचा खळखळाट,
मुलं म्हणजे आनंद उत्साहाचा स्त्रोत,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!