Paneer Badam Milk Recipe: दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा होतो. या दिवशी घरातील चिमुकल्यांसाठी काही खास बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. मुलांना गिफ्ट देण्यासोबतच त्यांच्यासाठी खास रेसिपी बनवून तुम्ही त्यांचा दिवस आणखी खास बनवू शकता. मुलांना मिल्क शेक प्यायला आवडते. अशावेळी तुम्ही त्यांना पनीर बदाम दूध देऊ शकता. विशेष म्हणजे ही रेसिपी जेवढी टेस्टी आहेत तेवढीच ती हेल्दी सुद्धा आहे. हे प्यायल्यानंतर मुलांचे पोट बराच काळ भरलेले राहते. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी पनीर बदाम दूध कसे बनवायचे.
- किसलेले पनीर - १/२ कप
- बदाम - १/२ कप
- दूध - ४ कप
- केशर- चिमूटभर
- वेलची पावडर - १/२ टीस्पून
- साखर - १/२ कप
हे दूध बनवण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर त्याची साल काढा. तुम्ही हे बदाम काही तास सुद्धा भिजवू शकता. आता हे भिजवलेले बदाम ग्राइंडरमध्ये दोन-चार चमचे पाणी घालून बारीक करून घ्या. एका पॅनमध्ये दूध घाला आणि उकळवा. दूध उकळायला लागल्यावर त्यात किसलेले पनीर टाका आणि मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. आता पॅनमध्ये साखर, बदामाची पेस्ट, वेलची पावडर आणि केशर घालून मिक्स करा. थोडेसे उकळा आणि गॅस बंद करा. तुमचे हेल्दी पनीर बजाम दूध तयार आहे. ते एका ग्लासमध्ये काढा आणि सर्व्ह करा. तुम्ही हे मुलांना संध्याकाळच्या वेळी सुद्धा देऊ शकता.