Hack if chewing gum sticks to hair: मुलं अनेकदा गुपचूप च्युईंगम खातात. आणि कधी कधी ते कपड्यांवर चिकटवतात. शाळेत खोड्या करतानाही, मुले एकमेकांच्या केसांवर किंवा कपड्यांवर च्युईंगम चिकटवण्याचे विनोद करतात. परंतु कपड्यांवरील आणि केसांवरील च्युईंगम सुकल्यानंतर ते काढणे कठीण होते. कापड फाटले तरी ते निघण्याचं नाव घेत नाही. तर बहुतांश वेळा केसांना च्युईंगम चिकटल्यानंतर केस कापावे लागतात. त्यामुळे अनेकजण च्युईंगम चिकटल्याने घाबरून जातात. परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. या सोप्या युक्तीच्या मदतीने तुम्ही कपड्यांमधून किंवा केसांमधून क्षणार्धात च्युईंगम काढून टाकू शकता.
जर तुमच्या किंवा मुलांच्या कपड्यांवर च्युईंगम चिकटला असेल, तर काळजी करू नका, फक्त बर्फाचा तुकडा घ्या आणि च्युईंगमच्या भागावर चोळा. कापड आणि च्युईंगम पूर्णपणे थंड होईपर्यंत बर्फ त्यावर चोळून घ्या. च्युईंगम पूर्णपणे थंड होताच, आपल्या हातांनी काढून टाका. ते अगदी सहजपणे कपड्यांवरून निघून जाईल. जर सर्व काही एकाच वेळी निघत नसेल तर बर्फाचे अधिक तुकडे घासून घ्या. काही वेळातच सर्व च्युइंगम सहज निघून जातील.
नेल रिमूव्हरचा वापर कपड्यांमधून च्युईंगम काढण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. च्युईंगमला नेल रिमूव्हर लावा. यामध्ये असलेले अल्कोहोल आणि पॉलिमर कपड्यांना च्युइंगमपासून मुक्त होण्यास मदत करते.
जर कपड्यांप्रमाणे केसांवरसुद्धा च्युईंगम चिकटला असेल, तर काळजी करण्याची किंवा केस कापण्याची गरज नाही. फक्त तीन ते चार बर्फाचे तुकडे रुमाल किंवा कापडात गुंडाळा आणि एक बंडल बनवा. हे बंडल घ्या आणि च्युईंगम चिकटलेल्या भागावर चोळून घ्या. केस पूर्णपणे थंड झाल्यावर च्युईंगम हलक्या हाताने काढून टाका. वारंवार आणि हळूहळू चोळल्याने सर्व च्युईंगम केसांमधून निघून जाईल.
याशिवाय केसांमधून च्युईंगम काढण्यासाठी हेअर स्प्रे वापरा. आणि हळू हळू च्युईंगम काढून टाका. यामुळे च्युइंगम सहजपणे निघून जाईल. त्यामुळे इथून पुढे कपडे किंवा केसांवर च्युईंगम चिकटल्यास घाबरून न जाता या सोप्या टिप्स फॉलो करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)