Spicy garlic-onion chutney: स्वयंपाक करताना बहुतांश वेळा घरात स्त्रियांना दररोज भाजीसाठी काय करावं हाच प्रश्न पडलेला असतो. त्याच-त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यामुळे महिला नवनवीन रेसिपी शोधत असतात. अशातच लोणचे-चटणी या गोष्टी जेवणाचा आस्वाद वाढवत असतात. जेवणात चटणीचा समावेश केला तर जेवणाची चव दुप्पट वाढते. चटणी असल्याने काही लोक जास्त खातात. अनेकदा तुम्ही कोथिंबीर, कैरी, पुदिना, आवळा, शेंगदाणा किंवा खोबऱ्याची चटणी तयार करून खाता. पण तुम्ही कधी लसूण-कांद्याची चटणी खाल्ली आहे का? कांद्यापासून बनवलेली चटणी स्वादिष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर असते. भाजीसाठी घरी काहीच नसेल तरीसुद्धा ही चटणी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. शेफ कुणाल कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही चविष्ट रेसिपी शेअर केली आहे.
कांदा - २ कप
लसूण - १०-१२ पाकळ्या
मेथी दाणे - अर्धा टीस्पून
उडदाची डाळ- अडीच चमचे
चना डाळ - २ चमचे
मेथी दाणे - अर्धा टीस्पून
जिरे - १-१/२ टीस्पून
धणे - १ टीस्पून
बडीशेप - १ टेबलस्पून
तेल - ३ चमचे
जिरे - अर्धा टीस्पून
कढीपत्ता - ६-७ पाने
गूळ - २ चमचे
लाल तिखट - २ चमचे
चिंचेचे पाणी - अर्धा कप
पाणी - गरजेनुसार
मीठ - चवीनुसार
हिंग - अर्धा टीस्पून
मोहरी - १ टीस्पून
कांदा-लसणाची चटणी बनवण्याची रेसिपी-
कांदा लसणाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा कापून घ्या. कढईत तीन चमचे तेल टाकून गरम करा. आता त्यात चणा डाळ आणि उडीद डाळ घाला. तसेच मेथी, जिरे, बडीशेप, धणे, लसूण घालून परतून घ्या. कांदा लालसर-सोनेरी रंगाचा झाल्यावर त्यात लाल तिखट आणि चिंचेचे पाणी घालून परतावे. पाणी आटल्यावर गॅस बंद करा.
थोडं थंड करून मिक्सरला लावा. गरजेनुसार पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्या.पुन्हा गॅसवर एक कढई ठेवा आणि तेल घाला. आता त्यात हिंग पावडर, अर्धा चमचा उडीद डाळ, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूण-कांद्याची पेस्ट घाला. नीट ढवळून घ्यावे. आता चवीनुसार मीठ आणि गूळ घालून मिक्स करा. मसालेदार गोड कांदा-लसूण चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही भाकरी-चपातीसोबत खाऊ शकता. शिवाय तुम्ही डोसा आणि नानसोबतसुद्धा ही चटणी ट्राय करू शकता.