Cheese Health Benefits : चीज ओव्हरलोड पिझ्झा, बर्गर किंवा सँडविच आपल्या सर्वांनाच आवडते. सगळ्यांनाच आवडणाऱ्या चीजमध्ये अनेक पोषक घटक असतात. यात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन के -२ सारखे घटक असतात. यात व्हिटॅमिन-बी आणि व्हिटॅमिन-डी भरपूर प्रमाणात असते. चीजचा तुकडा एक ग्लास दुधाच्या समतुल्य मानला जातो. हे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर, मग जाणून घेऊया पनीरच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी-
कॅल्शियमची कमतरता भरून काढते
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस होतो. या विशेषत: रजोनिवृत्तीतून जात असलेल्या स्त्रियांना याचा त्रास जास्त होतो. वृद्ध आणि कुपोषित मुलांमध्येही ही समस्या आढळते. प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे समृद्ध आहार घेऊन यावर उपचार केला जाऊ शकतो. हे तिन्ही घटक चीजमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त लोक आपल्या आहारात चीजचा समावेश करू शकतात.
स्नायू बळकट होतात
चीजमध्ये असणारी नैसर्गिक चरबी वजन वाढू देत नाही. बाजारात अनेक प्रकारचे चीज उपलब्ध आहेत, ज्यात कमी चरबी असते. अशा वेळी आपण आहारात कमी चरबीयुक्त चीजचा समावेश करू शकता. यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे असतात, ज्यामुळे स्नायू बळकट होतात.
पाचक समस्या दूर होतात
संतृप्त चरबीयुक्त चीजमध्ये मायक्रोबॅक्टेरिया असतात, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. चीज चयापचय प्रक्रिया वाढविण्यासाठी आणि पाचक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी-१२ आणि त्यात असलेले बॅक्टेरिया पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. यात ओमेगा ३,६ आणि मेंदूसाठी फायदेशीर अमिनो अॅसिड असते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
चीजमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराला होणाऱ्या आजारांचा धोकाही कमी होतो. हे खाल्ल्याने शरीराला जास्त व्हिटॅमिन सी मिळेल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.
उच्च रक्तदाब होईल कमी
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना त्यांच्या आहारात चीज समाविष्ट केल्याने त्यांचा सिस्टोलिक रक्तदाब २-४ मिमीएचजीने कमी होऊ शकतो. आपण आपल्या सोडियमच्या सेवनाबद्दल जागरूक असले पाहिजे, दररोज १५०० मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम खाऊ नये. पॅकेजिंग उत्पादनाची तपासणी केल्यानंतरच ज्यात कमी सोडियम असेल असे पदार्थ घ्या.
(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या