मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Recipe: पावसाळ्यात काही चमचमीत खायची इच्छा झालीये? मग बनवा अगदी सोपे आणि चवदार चीज कॉर्न कटलेट

Recipe: पावसाळ्यात काही चमचमीत खायची इच्छा झालीये? मग बनवा अगदी सोपे आणि चवदार चीज कॉर्न कटलेट

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 19, 2024 05:11 PM IST

Cheese Corn Cutlet Recipe: गरमगरम चीज कॉर्न कटलेट पावसाळ्यात खाण्याला अनेकांची पसंती असते. पण हे कटलेट कसे बनवायचा असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया चीज कॉर्न कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी...

Cheese Corn Cutlet
Cheese Corn Cutlet (Shutterstock)

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. जवळपास सगळीकडेच पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे थंडगार वातावरण तयार झाले आहे. अशा वातावरणात गरमगरम चटपटीत पदार्ख खाण्याकडे अनेकांचा कल असतो. अशावेळी घरच्या घरची अगदी पटकन कोणते पदार्थ बनवता येतील याकडे गृहीणींचा कल असतो. चीज कॉर्न कटलेट बनवणे हा योग्य पर्याय ठरु शकतो. पण हे कटलेट कसे बनवायचे असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया चीज कॉर्न कटलेट बनवण्याची अगदी सोपी रेसीपी

चीज कॉर्न कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य
वाचा: 'हे' पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यावर होतात खराब, मास्टर शेफ पंकजकडून जाणून घ्या कारण

- २ कप स्वीट कॉर्न

- १ कप चीज

ट्रेंडिंग न्यूज

- ४ चमचे किसलेले गाजर

- ४ चमचे चिरलेली शिमला मिरची

- १ बारीक चिरलेला कांदा

- ४ चमचे चिरलेली कोथिंबीर

- अर्धा चमचा हळद

- १ टीस्पून तिखट

- १ टीस्पून धणे पूड

- ४ टीस्पून जिरे पूड

- ४ टीस्पून मीठ

- ४ उकडलेले बटाटे

- अर्धा कप ब्रेड क्रम्ब्स

- ४ टेबलस्पून कॉर्न फ्लोर

चीज कॉर्न कटलेट बनवण्याची कृती

चीज कॉर्न कटलेट बनवण्या सर्वात आधी मका उकडून घ्या. त्यानंतर तो थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करुन घ्या. एक मोठे भांडे घ्या. त्यामध्ये मक्याची केलेली पेस्ट टाका. त्यात गाजर, शिमला मिरची, कांदा, हिरवी कोथिंबीर घाला. आता हळद, मिरची, धणे पूड, जिरे पूड आणि मीठ घाला. आता त्यात २ बटाटे आणि किसलेले चीज घालून चांगले मिक्स करा. ब्रेड क्रम्ब्स आणि कॉर्न फ्लोर घाला. सगळे साहित्य टाकल्यानंतर मिश्रण एकजीव करुन घ्या. चांगले मऊ असे मळा. त्यानंतर हाताला तेल लावून हे कटलेटचा आकार द्या.
वाचा: अलका याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार कोणता? ताणतणावामुळे होऊ शकते का ही समस्या?

दुसरीकडे एका मोठ्या कढईत तेल टाकून ते तापत ठेवा. तेल चांगले तापल्यानंतर तयार केलेले कटलेट तळण्यासाठी ठेवा. सोनेरी रंगाचे होई पर्यंत हे कटलेट तळा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. कटलेट तेलात डीप फ्राय करा. तळलेले हे कटलेट तेलकट लागू नयेत यासाठी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवा. त्यावर तळलेले कटलेट काढून ठेवा. तुमचे क्रिस्पी चीज कॉर्न कटलेट तयार आहे. तुम्ही चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत ते खाऊ शकता.

WhatsApp channel