Vistara anniversary sale: भारतात अनेक एअरलाईन्स आहेत ज्या आपली सेवा देतात. यामधीलच एक प्रसिद्ध एअरलाईन्स म्हणजे विस्तारा. विस्ताराला हवेमध्ये उड्डाण करून ९ वर्ष झाली आहेत. विस्तारा आपला ९वा वर्धापनदिन साजरा करत आहे. याच निमित्ताने या एअरलाईन्सने त्यांच्या प्रवाशांना एक खास गिफ्ट दिलं आहे. त्यांनी विविध मार्गांवरील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईटवर प्रवाशांना विशेष सवलत देत आहे. तुम्ही सप्टेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही प्रवासासाठी या डिस्काउंटसह फ्लाइट बुक करू शकता.
विस्तारा एअरलाइन्सने वर्धापन दिनाचा मोठा सेल जाहीर केला आहे. त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत सांगितले की, आम्ही ९ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत. आम्ही आमच्या वर्धापनदिन सेलची घोषणा करत आहोत. ही ऑफर एअरलाइन्सच्या तिन्ही वर्गांवर अर्थात इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासवर लागू आहे. या ऑफरसह प्रवासी ९ जानेवारी २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत फ्लाइट बुक करू शकतात.
या सेलमध्ये इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास या तिन्हीवर ऑफर मिळत आहेत. देशांतर्गत प्रवाशांसाठी, इकॉनॉमी क्लासमध्ये (गुवाहाटी-दिब्रूगड) भाडे रु. १,८०९ पासून, प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये रु. २,३०९ (गुवाहाटी-दिब्रुगढ) आणि बिझनेस क्लास (अहमदाबाद-मुंबई) ९,९०९ रु.अशा अनेक ऑफर्स आहेत. एअरलाइन्सच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांसाठी सेल ऑफर ९ जानेवारी २०२४ पासून सुरू होईल आणि ११ जानेवारी २०२४ पर्यंत चालेल, ज्यामध्ये तुम्ही ९ जानेवारी २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत फ्लाइट तिकीट बुक करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)