एप्रिल किंवा मे महिना म्हटलं की लग्नसराई सुरु होते. महिलांना प्रत्येक लग्नात वेगवेगळ्या साड्या, ड्रेसेस, त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी परिधान करायची असते. पण प्रत्येक ड्रेस व साडीवर मॅचिंग होईल अशी ज्वेलरी कमी पैशामध्ये कुठे मिळेल? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला तर मग आज जाणून घेऊया मुंबईत असे काही बाजार आहेत जेथे एकदम स्वस्त दरात एकदम मस्त अशी ज्वेलरी मिळते.
सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक ड्रेसवर सोन्याचे दागिने घालणे हे शक्य नाही. तसेच सोने घालून फिरणे देखील धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे महिला आर्टिफिशियल दागिन्यांना मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. आर्टिफिशियल दागिने सोने-चांदीचे नसले तरी दिसायला अतिशय आकर्षक असतात. त्यामुळे असे आर्टिफिशियल दागिने मुंबईत असे काही मर्केट आहेत, जेथे तुम्हाला स्वस्त आणि आकर्षक दरात मिळतील.
वाचा: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का ठेवला जातो? जाणून घ्या जबरदस्त फायदे
मुंबईतील भुवलेश्वर बाजारात नेहमीच तुफान गर्दी असते. लग्नासाठी जर तुम्हाला आर्टिफिशियल दागिने खरेदी करायचे असतील तर भुवलेश्वर बाजार हा सर्वात योग्य आणि उत्तम पर्याय आहे. पारंपरिक दागिने या बाजारात खूप स्वस्त आणि मस्त दरात मिळतात. त्यामुळे या मार्केटला नक्की भेट द्या...
वाचा: चेहऱ्यावर चमक हवी असेल तर नक्की फॉलो करा या गोष्टी, तरच दिसेल ग्लो
मुंबईतील फोर्ट परिसरात असणाऱ्या कोलाबा कॉजवे या बाजारात नेहमीच वेस्टर्न दागिने मिळतात. तसेच या मार्केटमध्ये पॉकेटफ्रेंडली दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी ग्राहक येतात. सुंदर ऑक्सिडाइज कानातले, गळ्यातले आणि नोज पिन या मार्केटमध्ये अतिशय सुंदर मिळतात. हा मार्केट चर्चगेट रेल्वेस्थानकापासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे.
वाचा: तुमच्या कारमध्ये असू शकतात कर्करोग निर्माण करणारे घटक, अभ्यासात आले समोर
वांद्रे परिसरातील लिंकिंग रोड हे देखील शॉपिंगसाठी सर्वात उत्तम ठिकाण आहे. येथे वेस्टर्न कपडे मोठ्या प्रमाणावर मिळतात. शिवाय कपडे, चपला आणि ज्वेलरीसाठी देखील हे मार्केट प्रसिद्ध आहे. मार्केटमध्ये तुम्ही नेकपीसपासून इयररिंग्स, ब्रेसलेट, आंगठी खरेदी करु शकता. वांद्रे स्टेशन बाहेरून लिंकिंग रोडला जाण्यासाठी रिक्षा सुरु असतात.
हिल रोड हे ठिकाण देखील खरेदीसाठी उत्तम आहे. हिल रोड खास करुन वेस्टर्न कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण या मार्केटमध्ये दागिनेसुद्धा मिळतात. तुम्ही येथे सध्या ट्रेंडी असलेले तसेच ऑक्सिडाइज दागिने खरेदी करू शकता. रस्त्यावरील स्टॉल्सपासून ते दुकानांपर्यंत अनेक प्रकारचे दागिने येथे मिळतील. वांद्रे स्थानकापासून ही बाजारपेठ खूपच जवळ आहे. स्टेशनपासून सुमारे २० मिनिटे चालत या अंतरावर आहे.