Benefits of Mantra Jaap: मंत्रांमध्ये खूप शक्ती असते. आपली संस्कृती फारच रिच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जप फार महत्त्वाचे आहे. जीवनातील दुःख, रोग आणि संकटे दूर करण्यासाठी मंत्रांचा जप केला जातो. असे मानले जाते की जप केल्याने भगवान शिव सहज प्रसन्न होतात. भगवान शिवाला समर्पित मंत्रांचा जप केल्याने आपल्याला समस्यांवर मात करण्यास मदत होते. शिव जी विनाशाचा देव आहे आणि दयेचे प्रतीक देखील आहेत. शास्त्रात सांगितले आहे की मंत्रोच्चार केल्याने मानवी शरीर आणि आत्मा शुद्ध राहतो. तसेच या मंत्राचा जप केल्याने निरोगी आयुष्य लाभते. तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते.
- ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
- शिव गायत्री मंत्र - ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रूद्र प्रचोदयात्
- ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ।।
- श्री शिवाय नम: ।।
श्री शंकराय नम: ।।
श्री महेशवराय नम: ।।
ॐ नमो भगवते रूद्राय।।
- करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसंवापराधं ।
विहितं विहितं वा सर्व मेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो ॥
या मंत्रांचा जप केल्याने कुटुंबात कोणताही त्रास होत नाही. या मंत्रांचे शब्द आपले मन शांत करते आणि दीर्घकाळासाठी शांत राहते. या मंत्रांचा जप केल्याने शरीरही निरोगी राहते.तुम्हाला तणावमुक्त व्हायचं असेल तर आवर्जून जप करा. तुमच्या तळहाताकडे पाहत या मंत्रांचा जप करा. या मंत्रांना रोज सकाळी तुमच्या जीवनाचा भाग बनवा आणि त्याचे फायदे मिळवून घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)