Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य एक अशी व्यक्ती होती जी २० व्या शतकातील सर्वात हुशार, ज्ञानी आणि विद्वान व्यक्ती म्हणून ओळखली जात होती. आजही क्वचितच कुणी असेल ज्याला त्यांच्याबद्दल माहिती नसेल. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या काळात अनेक धोरणे रचली होती. असे म्हटले जाते की, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या धोरणांचे अनुकरण करते किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते तेव्हा त्याला यशस्वी आणि समृद्ध आयुष्य मिळते.
आजही लोक आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी किंवा आयुष्यात यश मिळवण्यासाठी चाणक्य नीतीचा आधार घेतात. चाणक्य नितीमध्ये जवळपास आयुष्यातील सर्वच अडचणींबाबत उल्लेख करत उपाय सांगण्यात आले आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या वाईट काळाबद्दलही सांगितले आहे. या धोरणामध्ये त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या वाईट काळातून बाहेर येऊ शकता. आज आपण याच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
चाणक्य नीतीनुसार, तुमच्यासाठी कितीही वाईट वेळ आली किंवा तुमच्यावर कितीही मोठी समस्या आली तरी तुम्ही कधीही नकारात्मक विचार तुमच्या मनात आणू नका. कोणत्याही परिस्थितीत, आपण नेहमी आपल्यामध्ये सकारात्मक विचार ठेवावे. कारण सकारात्मक विचारांमध्ये तुम्हाला त्या संकटामधून बाहेर काढण्याची पूर्ण क्षमात असते. जर तुम्ही नकारात्मक विचार केल्यास शरीरच नव्हे तर मनही कमजोर पडेल. त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचार करा.
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, काळ कितीही वाईट आला तरी तुम्ही तुमच्या आरोग्याच्याबाबतीत कधीही हार मानू नका. परिस्थिती कितीही बिकट झाली तरी तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा. योग्य आहार घ्या, व्यायाम करा, जेणेकरून तुम्ही शारीरिकरित्या मजबूत राहाल.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा कुणीही वाईट काळातून जातो किंवा संकटांचा सामना करतो, तेव्हा त्याने कोणतेही काम अत्यंत संयमाने करावे. इतकेच नव्हे तर अशा वेळी माणसाने आपली पूर्ण बुद्धिमत्ता आणि विवेकही वापरला पाहिजे. संयम ठेऊन काम केल्यास तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. मात्र संयम नसल्यास तुम्हीही आणखी मोठी चूक करू शकता.
चाणक्य नीतीनुसार, तुम्ही कितीही वाईट काळात अडकले असाल किंवा वाईट काळातून जात असाल. तुम्ही सत्य कधीही सोडू नये. सत्याचा हात धरून परिस्थितीपुढे कधीही हार मानू नये. कारण नेहमीच आपण वाचलंय की शेवटी सत्याचाच विजय होतो.