Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य हे एक अतिशय बुद्धिमान, राजकारणी आणि विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जातात. असे म्हणतात की जेव्हा कोणीही त्याच्या सल्ल्याचे पालन करतो तेव्हा त्याचे जीवन यश आणि आनंदाने भरून जाते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अनेक मूल्ये सांगितली होती. या मूल्यांमध्ये आयुष्यातील अनेक प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये हे देखील मोठ्या तपशीलाने सांगितले आहे. आजही आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी चाणक्य नीतीचा अवलंब केला जातो. जर तुमच्याही घरात प्रगती होत नसेल तर त्यामागे काही महत्वाची कारणे असू शकतात. या कारणांचा उल्लेख चाणक्य नीतीमध्ये आहे. पाहूया ती कारणे नेमकी कोणती आहेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुम्ही तुमचे घर अस्वच्छ ठेवले किंवा घरात घाण पसरली तर ते तुमच्या घराची प्रगती थांबवू शकते. धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. जर तुमच्या घरात काही वस्तू इकडे तिकडे पडून असतील तर तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरांमध्ये देवाचे नाव घेतले जात नाही किंवा पूजा केली जात नाही त्या घरांमध्ये सुख कधीच टिकत नाही. अशा घरांमध्ये नेहमीच नकारात्मकता असते. या घरांतील वातावरण कधीच चांगले नसते. या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनात अशांतता असते. वातावरण प्रसन्न नसल्याने यांना कोणत्याच कामात प्रगती होत नाही, यश मिळत नाही.
चाणक्य नीतीनुसार, ज्या घरांमध्ये महिलांचा आदर केला जात नाही अशा घरांवर माता लक्ष्मी नेहमी कोपलेली असते. अशा परिस्थितीत लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर आणि जीवनावर राहावी असे वाटत असेल, तर तुम्ही महिलांचा आदर केला पाहिजे. महिलांचा आदर केल्याने घरात सुखसमृद्धी वास करते.
चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही घरात नेहमी भांडण किंवा कलहाचे वातावरण असेल तर त्या घराची प्रगती कधीच होऊ शकत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरांमध्ये अनेकदा भांडणाचे वातावरण असते, त्या घरांमधून धन देवी लक्ष्मी रागाने निघून जाते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)