Chanakya Niti: पतिपत्नीच्या प्रेमळ नात्याला उध्वस्त करतात 'या' चुका, 'चाणक्य नीती'मध्ये दिलाय महत्वाचा सल्ला-chanakya niti these mistakes destroy the relationship of husband and wife important advice given by acharya chanakya ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: पतिपत्नीच्या प्रेमळ नात्याला उध्वस्त करतात 'या' चुका, 'चाणक्य नीती'मध्ये दिलाय महत्वाचा सल्ला

Chanakya Niti: पतिपत्नीच्या प्रेमळ नात्याला उध्वस्त करतात 'या' चुका, 'चाणक्य नीती'मध्ये दिलाय महत्वाचा सल्ला

Sep 22, 2024 08:12 AM IST

Thoughts of Acharya Chanakya: चाणक्याच्या मते, जे पती-पत्नी चांगल्या गुणांनी परिपूर्ण असतात आणि स्वच्छ विचार असतात तेच सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतात.

Chanakya niti
Chanakya niti

Chanakya Niti Marathi:  चाणक्यानी म्हटले आहे की, सद्गुणी स्त्री आणि बुद्धिमान पती ही आयुष्याच्या वाहनाची दोन चाके आहेत. हे दोघे एकत्र चालले की, आयुष्याचा प्रवास सुखकर होतो. आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारची समस्या येऊ शकत नाही. धर्म, शास्त्र आणि वेद समजून घेणारी स्त्री कुटुंबाला वैभव प्राप्त करून देते. असे चाणक्याने म्हटले आहे. जो माणूस सन्मान, नैतिकता आणि नीतिमत्तेचा मार्ग अवलंबून आपले ध्येय साध्य करतो तो समाजात अनुकरणीय असतो. चाणक्याच्या मते, जे पती-पत्नी चांगल्या गुणांनी परिपूर्ण असतात आणि स्वच्छ विचार असतात तेच सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतात. ज्या पती-पत्नीमध्ये हे दोष असतात त्यांचे स्वतःचे वैवाहिक आयुष्य खराब होते.त्याच वेळी, ते कुटुंबातील इतर सदस्यांसाठीदेखील समस्या निर्माण करतात. अशा जोडप्याचे भविष्य अंधकारमय होऊ लागते आणि जीवन दिशाहीन होते.

खोटे बोलण्याची सवय-

कधीही खोटे बोलू नये. प्रत्येकाला त्रास देणारा हा दुर्गुण आहे. ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगले नाही. खोटे बोलणे कोणतेही नाते खराब करते. पती-पत्नीचे नाते इतके पवित्र असते की त्यात खोटेपणा येऊ नये. परंतु जर तुम्ही आपल्या जोडीदाराशी खोटे बोलत असाल तर त्यामुळे तुमचे नाते उध्वस्त होऊ शकते.

रागावर नियंत्रण नसणे-

राग हा एक दुर्गुण आहे जो माणसाच्या बुद्धीचा नाश करतो. प्रत्येक मुद्द्यावर रागावणारे पती-पत्नी मानसिक तणावात राहतात. माणसाच्या चांगल्या गुणांचा नाश होतो. क्रोधामुळे वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतो. ज्यामुळे कुटुंबातील शांतता बिघडते. त्यांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही.

जास्त पैसे खर्च करण्याची सवय-

माणसाला पैशांचा समतोल राखणे खूप गरजेचे असते. एखाद्या व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी, त्याला उत्पन्न आणि खर्चाचा समतोल माहित असणे आवश्यक आहे. ज्यांना खर्च आणि कमाई समजत नाही ते उद्ध्वस्त होतात. अशा व्यक्ती प्रत्येक संधीवर स्वतःला एकटे करतात आणि काही काळानंतर उध्वस्त होतात.

मूल्यांचा आणि संस्कारांचा त्याग-

पती-पत्नीने कोणत्याही परिस्थितीत आपल्या शिष्टाचार आणि मूल्यांचा त्याग करू नये. नाती टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही समान आहे हे लक्षात ठेवा. जेव्हा हे दोन्ही गुण नाहीसे होऊ लागतात तेव्हा घरातील वातावरण कलह आणि अशांततेने भरून जाते. अशावेळेतही संस्कार आणि मूल्ये पाळले तरच सर्व जबाबदाऱ्या पार पाडता येतात. हे गुण माणसाला महान बनवतात आणि त्यामुळेच त्याला मानसन्मान मिळतो.

 

Whats_app_banner
विभाग