Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्यबद्दल आपल्या सर्वांनच माहिती आहे. त्यांना विसाव्या शतकातील सर्वात जाणकार आणि अभ्यासू पुरुषांच्या श्रेणीत ठेवले आहे. चाणक्याने आपल्या हयातीत अनेक प्रकारच्या धोरणांची रचना केली होती. असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती या धोरणांचे पालन करते किंवा या धोरणांनुसार आपले जीवन जगते तेव्हा त्याला आनंदी आणि समृद्ध जीवन मिळते. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कोणतेही काम केल्यास अपमानही सहन करावा लागतो.
आचार्य चाणक्य यांनीही आपल्या धोरणांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यांमुळे तो कितीही शिक्षित असला तरी त्याला मूर्ख समजले जाते. इतकेच नव्हे तर या लोकांकडे करोडोंची संपत्ती असली तरी जग त्यांचा आदर करत नाही. पाहूया असे लोक नेमके कोण आहेत.
स्वतःला ज्ञानी समजणारा व्यक्ती-
चाणक्य नीतीमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यापैकी असे लोक आहेत जे स्वतःला सर्वात जास्त ज्ञानी समजतात. अशा लोकांना सर्वात मोठे मूर्ख मानले जाते कारण ते कोणत्याही विषयावर आपले ज्ञान देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. समाज अशा लोकांना मूर्ख किंवा अतिशहाणा समजतो. स्वतःच्या ज्ञानाचे कौतुक स्वतः करणाऱ्या व्यक्तीला समाजात काडीची किंमत नसते. त्यामुळे नेहमी इतरांनी आपल्या ज्ञानाचे कौतुक करणे आवश्यक आहे.
स्वत: ची प्रशंसा करणारा व्यक्ती-
चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती नेहमी स्वतःची स्तुती किंवा प्रशंसा करतो तो मूर्ख असतो. असे लोक नेहमी त्यांच्या पैशाची, बुद्धिमत्तेची किंवा सौंदर्याची प्रशंसा करत राहतात. अशा लोकांसमोर दुसऱ्याची स्तुती केली तर तेही चिडतात. परंतु अशा व्यक्तीला समाजात अजिबात मानसन्मान मिळत नाही.
जे विचार न करता काम करतात-
चाणक्य नीतीनुसार, असे लोक नेहमी मूर्ख मानले जातात जे कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करत नाहीत. अशा लोकांना आयुष्यात नेहमीच नुकसान सहन करावे लागते. जे लोक विचार न करता काम करतात ते कोणतेही काम केल्यावर काय परिणाम मिळतात याचा विचार करत नाहीत. त्यामुळे लोक अशा लोकांना मानसन्मानही देत नाहीत.
दुसऱ्यांना कमी लेखणारे लोक-
चाणक्य नीतीनुसार, कोणतीही व्यक्ती जो शिक्षित असूनही आपल्या कनिष्ठांशी आणि ज्येष्ठांशी कसे बोलावे हे जाणत नाही किंवा नेहमी त्यांचा अपमान करतो, तो मूर्ख समजला जातो. असे लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात. अशा लोकांना आयुष्यात कधीच मानसन्मान मिळत नाही. अफाट पैसा असूनही या लोकांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत नाही.