Chanakya Niti: 'हे' लोक कधीच बनू शकत नाहीत श्रीमंत, काय आहे कारण? वाचा चाणक्य नीती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: 'हे' लोक कधीच बनू शकत नाहीत श्रीमंत, काय आहे कारण? वाचा चाणक्य नीती

Chanakya Niti: 'हे' लोक कधीच बनू शकत नाहीत श्रीमंत, काय आहे कारण? वाचा चाणक्य नीती

Oct 10, 2024 08:02 AM IST

Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालले तर त्याला खूप यशस्वी आणि समृद्ध जीवन मिळू शकते.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti In Marathi:  20 व्या शतकातील सर्वात विद्वान आणि जाणकार व्यक्तींच्या यादीत असलेले आचार्य चाणक्य यांच्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती नसेल. असे म्हटले जाते की जर कोणी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालले तर त्याला खूप यशस्वी आणि समृद्ध जीवन मिळू शकते. आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या हयातीत अनेक धोरणे तयार केली होती. ज्यात त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. आणि कोणतीही समस्या कशी टाळता येईल हे देखील सांगितले होते. आजच्या लेखात आपण एखाद्या व्यक्तीच्या अशा काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांमुळे तो कधीच श्रीमंत होत नाही किंवा आपण असेही म्हणू शकतो की या चुकांमुळे माणसाकडे पैसा टिकत नाही. चला तर मग या चुकांची सविस्तर माहिती घेऊया.

पैशाचा अभिमान बाळगणारा-

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने कधीही पैशाचा अभिमान बाळगू नये. जर तुमच्याकडे असलेल्या पैशाचा तुम्हाला अभिमान असेल किंवा त्याबद्दल अहंकाराची भावना असेल तर तुम्ही लवकरच गरीब होऊ शकता. जे लोक आपल्याजवळ असलेल्या पैशाची बढाई मारतात त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो आणि अशा स्थितीत त्यांच्याकडे कधीही पैसा नसतो. त्यामुळे हे लोक कधीच श्रीमंत बनू शकत नाहीत.

फालतू खर्च करण्याच्या सवयी-

तुम्हीही विचार न करता विनाकारण पैसे खर्च करत असाल तर तसे करणे टाळावे. माणसाने कधीही विचार न करता पैसा खर्च करू नये. जर तुम्ही विचार न करता पैसे खर्च केले तर तुमची ही सवय तुम्हाला काही वेळातच गरीब बनवते. विचार न करता खर्च करणाऱ्यांच्या खिशात पैसा कधीच राहत नाही. हे लोक नेहमी पैशाअभावी लढत राहतात. असे कधीच श्रीमंत बनू शकत नाहीत.

कंजूस व्यक्ती

पैसे वाचवणे ही चांगली गोष्ट आहे, पण काही लोक असे असतात जे जास्त कंजूस होतात. अशा लोकांना नेहमीच आर्थिक कोंडीचा सामना करावा लागतो. या लोकांकडे पैसा टिकत नाही. कारण देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते.

चुकीच्या मार्गाने कमावणारे-

आचार्य चाणक्य यांच्या मते, अनेक लोक लवकर श्रीमंत बनण्यासाठी किंवा जास्त पैसे कमवण्यासाठी चुकीच्या मार्गावर जातात. हे लोक सतत त्या मार्गाने पैसे कमवतात. त्या लोकांकडे पैसा तर येतो, मात्र तो पैसा कधीच टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा जातो. त्यामुळे असे लोक कधीच श्रीमंत बनत नाहीत. शिवाय त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. त्यामुळे नेहमी योग्य मार्गाने पैसा कमवावा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner