Motivational Words of Acharya Chanakya: यश मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत घेत असतो. पण खूप कष्ट करूनही जर योग्य फळ मिळत नसेल तर त्रास होतो. आणि यामुळे अनेकदा पुढे जाण्यासाठी कष्ट करण्याची इच्छाही होत नाही. अशा वेळी चाणक्य यांची तत्त्वे आणि विचार तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. आचार्य चाणक्य एक महान विद्वान आणि कुशल रणनीतिकार होते. ज्यांची धोरणे आजही लोकांना मार्गदर्शन करतात. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी फॉलो करायला विसरू नका.
आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या योजना लोकांपासून नेहमी लपवून ठेवल्या पाहिजेत. अनेक वेळा आपले प्लॅन सांगितल्यामुळे हवे तसे फळ मिळत नाही. अशा वेळी शांतपणे काम करण्याचा प्रयत्न केल्यास बरे होईल. आपल्या गोष्टी सीक्रेट ठेवल्या पाहिजे.
चाणक्य सल्ला देतात की, कोणत्याही परिस्थितीत आपली बलस्थाने किंवा कमकुवतपणा कोणाच्याही समोर सांगू नका, जेणेकरून कोणीही त्यांचा वापर आपल्या विरोधात करू शकणार नाही.
जास्त प्रामाणिकपणा देखील चांगला नसतो. चाणक्य म्हणतात की प्रामाणिक लोकांना आधी फसवले जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी जास्त प्रामाणिक राहणे देखील चांगले नसते.
माणसाने स्वत:च्या चुकांपासून तसेच आजूबाजूच्या लोकांच्या चुकांमधून शिकले पाहिजे. इतरांच्या चुकांपासून शिकणे हे भविष्यातील चुका टाळण्यासाठी स्वतःच्या चुकांपासून शिकण्याइतकेच प्रभावी ठरू शकते. त्यामुळे चुकांवर रडण्यापेक्षा त्यातून शिकले पाहिजे.
चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीने कधीही नशिबावर अवलंबून राहून काम करू नये आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही आपल्या ध्येयावर ठाम राहावे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या