Chanakya Niti in Marathi: एक म्हण आहे की दुःख वाटून घेतल्याने कमी होते आणि सुख, आनंद वाटल्याने वाढतो. पण आचार्य चाणक्य म्हणतात की, आयुष्यात काही दु:खे आणि व्यथा अशी असतात जी कोणाशीही शेअर करू नयेत. असे म्हटले जाते की काही लोकांना आपल्या व्यथा, दु:ख सांगितल्याने आपली अस्वस्थता आणि समस्या आणखी वाढते. आपल्या व्यथा आणि दु:ख कोणासोबत शेअर करू नये हे येथे जाणून घ्या.
चाणक्य म्हणतात की, तुम्ही तुमच्या गोष्टी अशा लोकांशी शेअर करू नयेत जे सर्वांशी मैत्री करतात. अशी माणसं वेळ आल्यावर आपलं दु:ख इतरांसमोर मांडू शकतात. आपल्या गोष्टी, व्यथा ते इतरांना सांगू शकतात. त्यामुळे खोटी मैत्री करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नये.
आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवणारे, सर्व गोष्टी मस्करीत घेणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नये. असे लोक तुमचे दु:ख इतरांना सांगून त्याची खिल्लीही उडवू शकतात. अशा लोकांपासून दूर राहावे.
चाणक्य म्हणतात की, स्वार्थी किंवा मतलबी लोकांसमोर आपले दु:ख सांगू नये. हे लोक इतरांचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. स्वार्थी लोक इतरांचे दु:ख कमी समजू शकतात, असे म्हणतात. त्यामुळे अशा लोकांना आपल्या गोष्टी शेअर करू नये.
चाणक्य नीती सांगते की, ज्यांना इतरांचा हेवा वाटतो किंवा जे इतरांवर चिडतात, अशा लोकांना आपले दु:ख आणि व्यथा सांगू नयेत. चाणक्य म्हणतात की, वेळ आल्यावर ते आपले वर्तन बदलतात आणि इतरांसमोर लोकांच्या गोष्टींची खिल्ली उडवतात.
अनेकदा आपण पाहिले असेल की जे लोक जास्त बोलतात ते काहीही बोलतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. त्यामुळे विचार न करता बोलणाऱ्या लोकांजवळ आपल्या गोष्टी शेअर करणं टाळावं. कारण हे लोक तुमच्या गोष्टी कुणासमोरही सांगू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या