Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य सर्वांना माहीत आहेत. त्यांना सर्वात बुद्धिमान लोकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. चाणक्याने आपल्या हयातीत अनेक धोरणे तयार केली आहेत. ज्यांचे तुम्ही योग्य प्रकारे पालन केल्यास तुम्हाला जीवनात भरपूर यश मिळेल. आणि त्यासोबतच तुम्हाला तणावातूनही आराम मिळेल. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा उल्लेख केला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला चाणक्याने सांगितलेल्या अशा प्रकारच्या लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांना तुम्ही कधीही तुमच्या घरी बोलावू नका. असे लोक तुमच्या घरी आले तर घरातील सर्व सुख-शांती हिरावून घेतली जाते. चला तर मग जाणून घेऊया या लोकांबद्दल सविस्तर...
चाणक्य नीतीनुसार, तुम्ही कधीही स्वार्थी व्यक्तीला तुमच्या घरी बोलावू नये. असे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा किंवा स्वार्थाचा विचार करतात.असे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या घरात वादविवाद आणि भांडण निर्माण करू शकतात. शिवाय तुमच्या घराची शांती हिरावून घेऊ शकतात.
चाणक्य नीतीमध्ये अत्यंत हुशार किंवा दुष्ट मनाच्या लोकांना घरी बोलावण्यास मनाई आहे. अशी माणसे कधीच कोणाचीच नसतात. असे लोक तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला आग लावण्याचे काम करू शकतात. किंवा वाईट मनाने नजर लावू शकतात.
आचार्य चाणक्यानुसार, तुम्ही कधीही दोन तोंड असलेल्या लोकांना तुमच्या घरी बोलावू नये. ते तुमच्या समोर एक गोष्ट बोलतात आणि नंतर तुमच्या मागे काहीतरी वेगळं बोलतात. असे लोक तुमच्या घरात भांडण लावू शकतात. त्यामुळे अशा लोकांना कधीच स्वतःच्या घरात थारा देऊ नका.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल जो तुम्हाला गरज असेल तेव्हाच आठवतो. तुम्हाला विचारतो किंवा फायदा घेतो, तर तुम्ही त्याला कधीही तुमच्या घरी बोलावू नये. तुम्हाला अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
चाणक्य नीतीनुसार, अशा लोकांना कधीही आपल्या घरी बोलावू नये जे इतरांना दुखवून स्वतःचा आनंद घेतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. अशा लोकांची मानसिकता खूप वाईट असते. ते स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हालाही दुखवायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांना चार हात लांब ठेवलेले कधीही चांगले.