Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य हे त्या काळातील एक महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी 'चाणक्य नीती' या नावाने एक ग्रंथ रचला. जीवनाशी संबंधित अनेक विषय त्यांनी या नितीशास्त्रात सांगितले आहेत, त्यांचा अभ्यास केल्याने योग्य मार्गदर्शन मिळते. चाणक्य नीती जीवनात अंमलात आणून कोणतीही व्यक्ती यश मिळवू शकते. यात धार्मिकता आणि अधर्म, कर्म, पाप आणि पुण्य यांच्याशी संबंधित गोष्टींचा उल्लेख आहे. याशिवाय घराचा प्रमुख कसा असावा, हेही नमूद केले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, घराचा प्रमुख हा कुटुंबाचा मुख्य सदस्य आहे. त्याच्याकडे नेहमी इतरांपेक्षा जास्त जबाबदारी असते. अशा परिस्थितीत तो जबाबदार असला पाहिजे. सर्वांशी चांगले संबंध ठेवणारा, सर्वांच्या इच्छेची काळजी घेणारा आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राखणारा व्यक्ती एक उत्तम कुटुंब प्रमुख बनू शकतो. घरच्या प्रमुखामध्ये हव्या असणाऱ्या इतर गुणांबद्दल जाणून घेऊया.
चाणक्य नीतीनुसार घराचा प्रमुख हा हुशार असावा. तसेच कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन पैसा खर्च करणारा असावा. एवढेच नव्हे, तर कुटुंबातील सदस्यांचा फालतू खर्चही थांबवला पाहिजे. तसेच, त्याला पैशांचा योग्य वापर माहित असणे आवश्यक आहे. यामुळे कुटुंबात प्रगतीची शक्यता निर्माण होते आणि भविष्यासाठी पैशाची बचत देखील होते.
घराच्या प्रमुखाने नेहमी सतर्क राहावे. प्रत्येकाच्या म्हणण्यावर त्याने विश्वास ठेवू नये. स्वत:च्या डोळ्यांनी जे दिसते, त्यावर विश्वास ठेवून सर्व नातेसंबंध दृढ केले पाहिजेत. याशिवाय कोणतेही भांडण सोडवताना दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून निर्णय घ्यावा.
घरातील प्रमुख कुटुंबाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतो. अशा स्थितीत त्याची निर्णयक्षमता चांगली असायला हवी. तसेच, त्याच्या निर्णयामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
घरातील प्रमुख हा सर्वांच्या समस्या सोडवतो. अशा स्थितीत प्रमुखाने कधीही भेदभाव करू नये. सर्वांसाठी समान नियम आणि कायदे असले पाहिजेत.
जीवनात कोणतेही काम शिस्तीने केले, तर ते यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घरच्या प्रमुखाने कुटुंबात नेहमीच शिस्त पाळली पाहिजे. यामुळे घरातील लोक जीवनात प्रगती करू शकतात.
संबंधित बातम्या