Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य हे मौर्य काळातील तत्वज्ञ होते. गुप्त साम्राज्याच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या शब्दांचे पालन करून चंद्रगुप्त मौर्य महान राजा झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली गुप्त साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. आचार्य चाणक्य हे धर्मग्रंथाचे उत्तम जाणकार होते. त्यांनी निती शास्त्राची रचना केली आहे, जी आजही प्रासंगिक आहे. याशिवाय त्यांनी इतरही अनेक प्रमुख रचना केल्या आहेत. आचार्य चाणक्यांनी जीवनात यशस्वी होण्याचेही सूत्र दिले आहे. या नियमांचे पालन केल्याने एक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनू शकतो. वयाच्या २०व्या वर्षांनंतर आयुष्यात काही चुका करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. वयाच्या २०व्या वर्षांनंतर तरुणांनी 'या' चुका केल्या तर त्याचे परिणाम भविष्यात त्याला भोगावे लागतात. चला, त्याबद्दल जाणून घेऊया...
आचार्य चाणक्य नीती शास्त्रात सांगतात की, वयाच्या २०व्या वर्षानंतर अजिबात वेळ वाया घालवू नका. वेळ खूप मौल्यवान आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये. एकदा वेळ गेली की ती परत येत नाही. विनाकारण वेळ वाया घालवणाऱ्या लोकांना आयुष्यभर अडचणींचा सामना करावा लागतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी वक्तशीर असणे गरजेचे आहे.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार वयाच्या २० व्या वर्षांनंतर व्यक्तीने कामाच्या बाबतीत सावध असले पाहिजे. तुम्ही बेफिकीर राहिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. त्यामुळे आळस टाळावा. असे म्हटले जाते किंवा मानले जाते की, देव आळशी लोकांना कधीही मदत करत नाही. यासाठी तुमची कामे वेळेवर करा. त्यामुळे आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढते.
चाणक्य नीतीनुसार, वयाच्या २० व्या वर्षांनंतर माणसाने पैसा हुशारीने खर्च केला पाहिजे. विशेषतः तरुणाईमध्ये पैशाचे महत्त्व समजून घेणे खूप गरजेचे आहे. सध्या आर्थिक युग आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, पैसा असणे खूप महत्वाचे आहे. भविष्यात अडचणीच्या वेळी पैसाच उपयोगी पडेल. त्यासाठी पैसा हुशारीने खर्च करायला हवा.
आचार्य चाणक्य नीती शास्त्रात म्हणतात की, क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. माणसाचे विचार आणि समज रागात संपून जाते. वयाच्या २०व्या वर्षी नंतर प्रतिक्रिया देताना कृपया याचा विचार करा. तारुण्यात जास्त राग येतो. त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यासाठी योगा आणि ध्यानाची मदत घेता येईल.
संबंधित बातम्या