Chanakya Niti : भारतातील महान व्यक्तींपैकी एक म्हणून आचार्य चाणक्य यांचे नाव घेतले जाते. त्यांनी आयुष्यात नैतिकतेचे धोरण पाळून नीती तयार केल्या आहेत. या नीतीमध्ये त्यांनी मानवाला सुखी राहण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे आणि काय करु नये याविषयी सांगितले आहे. चाणक्य नीतीने पती-पत्नीच्या नात्याबाबत महत्त्वाची तत्त्वे दिली आहेत. पती-पत्नीचे नाते हे सर्वांत पवित्र नाते मानले जाते. आनंदी जीवनासाठी पती-पत्नीच्या नात्यातील गोडवाही तितकाच महत्त्वाचा असतो. पती-पत्नीच्या नात्यात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी चाणक्यांनी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य नीतीनुसार, प्रेम ही कोणत्याही नात्याची पहिली पायरी असते. नेहमी पहिली पायरी ही अतिशय मजबूत असावी लागते. त्याप्रमाणेच पत्नी आणि पत्नीच्या पावित्र्य नात्यामध्ये प्रेमाला सर्वात पहिले स्थान दिले जाते. या नात्यात खोटेपणा आणि दिखाव्याला जागा नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी टाळा. पती आणि पत्नीच्या नात्यामध्ये जितका प्रामाणिकपणा असेल तितकेच त्यांचे नाते घट्ट असेल.
एखाद्या प्रतिभावान किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या वैवाहिक आयुष्याच्या तणाव, दुःख आणि अनेक अडचणी असतील तर त्याच्या आयुष्यात नैराश्य व दु:खाने भरलेले असते असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. कोणत्याही नात्यात भांडण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे परस्पर समंजसपणाचा अभाव. अशा परिस्थितीत वैवाहिक नात्यात पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्यासाठी काही काळ द्याणे गरजेचे असते.
वाचा: कधीही 'या' तीन लोकांना मदत करु नये, काय सांगतात आचार्य चाणक्य वाचा
आचार्य चाणक्य यांच्या मते, सुखी वैवाहिक जीवन असणे खूप महत्त्वाचे असते. हे जीवन एखाद्या भेटवस्तू प्रमाणे असते. हे आयुष्य जितके आनंदी असेल तितक्याच तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतील. पती आणि पत्नीने एकमेकांवर कायम विश्वास ठेवायला हवा. या विश्वासाने त्यांचे नाते घट्ट होते. तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर करायला लागता. दोघांपैकी कोणीही आपल्या जोडीदाराचा आदर करत नसेल तर लवकरच नाते तुटते. विश्वासाचे बंधन जितके मजबूत असेल तितके तुमचे नाते अधिक मजबूत होईल. त्यामुळे एकमेकांवर विश्वास असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
संबंधित बातम्या