Chanakya Niti: सुशिक्षित असूनही 'या' लोकांना समजले जाते मूर्ख, तुम्हीसुद्धा आजच सोडा या सवयी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: सुशिक्षित असूनही 'या' लोकांना समजले जाते मूर्ख, तुम्हीसुद्धा आजच सोडा या सवयी

Chanakya Niti: सुशिक्षित असूनही 'या' लोकांना समजले जाते मूर्ख, तुम्हीसुद्धा आजच सोडा या सवयी

Dec 22, 2024 08:35 AM IST

Thoughts of Acharya Chanakya In Marathi: आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, जो आज चाणक्य नीती म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात चाणक्याने जीवन यशस्वी करण्यासाठी मूलभूत मंत्र दिले आहेत.

Acharya Chanakya's Rules
Acharya Chanakya's Rules

Chanakya Niti In Marathi:  हे चार प्रकारचे लोक अभ्यास करूनही मूर्ख असतात, जाणून घ्या आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, जो आज चाणक्य नीती म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात चाणक्याने जीवन यशस्वी करण्यासाठी मूलभूत मंत्र दिले आहेत. त्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा अवलंब केल्याने माणूस एक ना एक दिवस नक्कीच आपले ध्येय साध्य करेल. चाणक्य नीती स्त्री आणि पुरुष दोघांच्याही गुणवत्तेचे वर्णन करते. त्यांनी माणसाच्या काही सवयी सांगितल्या आहेत ज्यांमुळे अगदी शिकलेला माणूसही मूर्खासारखा दिसतो. इतकेच नव्हे तर असा माणूस कितीही श्रीमंत झाला तरी इतरांसमोर त्याचा आदर नसतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

स्वतःला बुद्धिमान समजणारा-

चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती स्वतःला जास्त बुद्धिमान समजतो तो मूर्खासारखा असतो. असे लोक इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवत नाहीत. तसेच इतरांशी बोलणेही ते योग्य मानत नाहीत. अशा लोकांना इतर कोणी सल्ला देतात तेव्हा ते सल्ला घेतल्यानंतरही त्यांचा अपमान करत राहतात.

इतरांना अपमानित करणारी व्यक्ती-

काही लोक असे असतात, जेव्हा ते जास्त अभ्यास करतात तेव्हा ते इतरांना कमी दर्जाचे समजू लागतात. असे लोक फक्त लहानांशीच नाही तर मोठ्यांशीही नीट बोलत नाहीत. आचार्य चाणक्यांनी अशा लोकांना मूर्ख मानले आहे. अशा लोकांना इतरांकडून कधीच आदर मिळत नाही.

बेपर्वा व्यक्ती-

जो विचार न करता काहीतरी करतो किंवा चौकशी न करता एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तो मूर्खासारखा असतो. अशा व्यक्तीसाठी चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, तो कितीही श्रीमंत झाला तरी त्याला इतरांकडून मान-सन्मान मिळत नाही.

स्वत: ची प्रशंसा करणारी व्यक्ती-

असे काही लोक असतात जे सर्वत्र स्वतःची स्तुती करत असतात. चाणक्य नीतीनुसार असे लोक मूर्ख असतात. असे लोक नेहमी त्यांच्या संपत्ती आणि बुद्धिमत्तेबद्दल बढाई मारतात. अशा व्यक्तीला त्याची स्तुती करणारे लोक आवडतात.

Whats_app_banner