Chanakya Niti: घराची जागा निवडताना घ्या विशेष काळजी, नाहीतर भविष्यात होईल पश्चाताप!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: घराची जागा निवडताना घ्या विशेष काळजी, नाहीतर भविष्यात होईल पश्चाताप!

Chanakya Niti: घराची जागा निवडताना घ्या विशेष काळजी, नाहीतर भविष्यात होईल पश्चाताप!

Published Aug 09, 2024 05:27 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्रात घरासाठी जागा निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सांगितले आहे. सुख, शांती हवी असेल तर घर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

चाणक्य नीती
चाणक्य नीती

Chanakya Niti in Marathi: आपण सर्वजण स्वप्न पाहतो की आपले स्वतःचे घर असावे. पण घर बांधण्याची जागा निवडताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. यामध्ये घर किती मोठे असावे, किती खोल्या असाव्यात, कोणत्या दिशेला उन्हाचा प्रकाश येईल, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. पण, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ आचार्य चाणक्य यांच्या मते, घराची जागा निवडताना आपल्याला यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागतो.

लोकयात्रा भयं लज्जा दाक्षिण्यं त्यागशीलता।

पञ्च यत्र न विद्यन्ते न कुर्यात्तत्र संगतिम् ॥

चाणक्य नीतीनुसार, घराची जागा निवडताना आपल्याला त्या परिसरातील लोकांचा स्वभाव, त्यांचे वर्तन आणि त्यांचे जीवन जगण्याचा पद्धती यांचा विचार करावा लागतो. चाणक्य म्हणतात, "घर बांधण्याची जागा अशी असावी की जिथे आपले कुटुंब सुखी रहेल. जिथे लोक आपल्या कुटुंबाची काळजी घेत नाहीत, जिथे दया, करुणा आणि क्षमा या गुणांचा अभाव आहे, तिथे आपले घर बांधू नका. अशा ठिकाणी राहिल्याने आपल्याला मानसिक शांती मिळणार नाही. आपले घर अशा ठिकाणी बांधावे जिथे सद्गुणांचे महत्त्व असते आणि लोकांमध्ये एकता आणि बंधुभाव असतो."

चाणक्य पुढे म्हणतात, “जिथे गुन्हेगारी वातावरण आहे, जिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, तिथे राहणे धोकादायक असते. आपले घर अशा ठिकाणी बांधावे जिथे सुरक्षा व्यवस्था चांगली असावी आणि आपण आपल्या कुटुंबासह सुरक्षितपणे राहू शकू.” चाणक्य यांच्या मते, घराची जागा निवडताना आपल्याला त्या परिसरातील पाणी, हवा आणि इतर मूलभूत सुविधांचाही विचार करावा लागतो. स्वच्छ पाणी आणि शुद्ध हवा ही निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात.

चाणक्य नीतीनुसार, घराची जागा निवडताना आपल्याला फक्त भौतिक गोष्टींचाच विचार करू नये, तर आपल्या मानसिक शांतीचाही विचार करावा. चांगल्या वातावरणात राहिल्याने आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते. आपण ज्या ठिकाणी राहतो, त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर, आपल्या विचारांवर आणि आपल्या भावनांवर खूप मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे, घराची जागा निवडताना आपण चाणक्य नीतीतील तत्त्वांचा अवलंब करावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner