Avoid Living with These People : आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रात जीवनाच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे. चाणक्यांनी सांगितलेली धोरणे आजच्या काळातही खूप फायदेशीर ठरतात. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणे कठीण वाटत असले तरी ते यश देणारे आहेत. आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख येते. नीतिशास्त्रात आचार्य चाणक्यांनी अशाच काही लोकांबद्दल सांगितले आहेत, जे आपल्या आयुष्यात फक्त दुःख घेऊन येतात. त्यांच्यापासून लांब राहिलेलं चांगलं असतं. असे कोणते लोक आहेत ते येथे जाणून घ्या.
या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात कोणते लोक दुःख आणतात ते सांगितले आहे. या श्लोकानुसार मूर्ख शिष्याला शिकवणे, दुष्ट स्त्रीबरोबर राहणे तसेच दुःखी आणि आजारी लोकांमध्ये राहणारे विद्वान व्यक्ती या नेहमीच दुःखी होतो.
या श्लोकमध्ये आचार्य चाणक्य असे सांगतात की, गुरू आणि शिष्य यांचे नाते हे कुलूप आणि चावीसारखे असते. कारण गुरु हे आपल्या समस्यांची अशी किल्ली आहे, जी शिष्याला यशाच्या मार्गाची गुरुकिल्ली प्रदान करते. गुरु आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कठीण क्षणाचा सामना करण्यासाठी, ते पार करण्यासाठी आणि जीवनातील अडचणींना तोंड देण्यासाठी तयार करतात. पण जर असा शिष्य अशा विद्वान व्यक्तीकडे आला की ज्याला काहीही माहित नाही आणि गुरुंनी दाखविलेल्या मार्गावर चालत असेल तर अशा मूर्ख शिष्यामुळे विद्वान माणूसही दुःखी होतो.
चाणक्य पुढे सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला चांगल्या जीवनसाथीची साथ मिळाली नाही तर त्याचे संपूर्ण आयुष्य दु:खाने भरलेले असते. चांगली पत्नी आपल्या पतीला चांगल्या आणि वाईट काळात साथ देते. पण जीवनसाथी योग्य नसेल तर आयुष्यात फक्त दुःख मिळेल. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे कधीही चांगले असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)