Chanakya Niti Marathi: आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा उल्लेख केला आहे. त्यांच्यामध्ये असे लोक आहेत ज्यांच्यासोबत आपण राहायला हवे आणि ज्यांच्यापासून आपण शक्य तितके अंतर राखले पाहिजे. असे म्हटले जाते की, चाणक्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास तुम्हाला यशस्वी आणि आनंदी जीवन मिळू शकते. आजची माहिती अशा लोकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे ज्यांना लोकांच्या समूहात राहायला आवडते आणि ते प्रत्येकाला आपला शुभचिंतक किंवा मित्र मानतात. आज आम्ही तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये उल्लेखित अशा लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यापासून तुम्ही लवकरात लवकर अंतर राखले पाहिजे. जर तुम्ही वेळीच त्यांच्यापासून स्वतःला दूर केले नाही तर ते तुमच्या विनाशाचे कारण बनू शकतात.
चाणक्याच्या मते, तुम्ही रागावलेल्या व्यक्तीपासून शक्य तितके अंतर ठेवावे. असे लोक आपला ताबा लवकर गमावतात आणि कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करत नाहीत. जर तुम्ही अशा लोकांसोबत राहत असाल तर नेहमीच भांडण आणि वादविवाद होण्याचा धोका असतो. अशा लोकांपासून नेहमी अंतर राखण्याचा प्रयत्न करावा.
आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही आळशी व्यक्तीपासून अंतर राखले पाहिजे. असे लोक आपले कोणतेही काम वेळेवर करत नाहीत. हे लोक फार लवकर इतरांच्या रागाला, तिरस्काराला बळी पडतात. अशा लोकांसोबत राहिल्यास तुम्हीही आळशी बनता. शिवाय तुम्हालाही लोक त्याच नजरेने पाहतात.
टीका करणारे लोक नेहमी इतरांमधील कमतरता शोधत राहतात. असे लोक इतरांची खूप चेष्टाही करतात. अशा लोकांशी मैत्री केल्यास तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. अशा लोकांपासून शक्य तितके अंतर राखले पाहिजे. जेणेकरून तुमचे हसू बनणार नाही.
काही लोक असे असतात जे नेहमी नकारात्मक गोष्टी बोलतात. त्यांची विचारसरणीही खूप नकारात्मक असते. तुम्हीही अशा लोकांसोबत राहत असाल तर लवकरच तुम्हीही असे व्हाल. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनेल, त्यामुळे अशा लोकांपासून वेळीच दूर राहा.
जे लोक लोभी अर्थातच लालची असतात ते नेहमी इतरांचा वापर करतात. जर तुम्ही अशा लोकांशी मैत्री करत असाल किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करत असाल तर असे करणे खूप धोकादायक ठरते. कारण हे लोक फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी इतरांना अडचणीत टाकतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणेच चांगले.