Chanakya Niti In Marathi: हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन आणि संपत्तीची देवी मानले जाते. असे मानले जाते की, जर तुमच्या कृतीने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर तुम्हाला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. परंतु अनेक लोक असे काम करतात ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि लोकांना तिचा आशीर्वाद मिळत नाही. आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्याबद्दल त्यांचे मत आहे की, व्यक्तीने आपल्या जीवनात या गोष्टींची नेहमी काळजी घेतली पाहिजे, तरच तो चांगले आणि आनंदी जीवन जगू शकतो. या लेखात आचार्य चाणक्य यांच्यानुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या देवी लक्ष्मीला नाराज करतात आणि आर्थिक अडचणींचे कारण बनतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, ज्या घरात अन्नाचा अपमान होतो त्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. कारण ते लोक नशीबवान असतात ज्यांना जेवायला अन्न मिळते. आणि जे अन्नाचा आदर करत नाहीत त्यांना देवी लक्ष्मी देखील मिळत नाही. त्यांना आशीर्वाद देत नाही.
आचार्य चाणक्य मानतात की, ज्या घरांमध्ये भुकेल्याला अन्न दिले जात नाही त्या घरांवर देवी लक्ष्मी खूप कोपलेली असते. कारण भुकेल्याला अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. आणि जे असे करत नाहीत त्यांना लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही.अशा अवस्थेत राहून ते नेहमीच आर्थिक संकटातून जात असतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, लोकांनी नेहमी चांगल्या कामातून पैसे मिळवायला हवेत. कारण चुकीच्या मार्गाने पैसे कमवणाऱ्या लोकांवर माता लक्ष्मी प्रचंड निराश असते. आणि त्यांना आशीर्वाद देत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो. त्यामुळे अशा लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
आचार्य चाणक्य मानतात की, ज्या घरांमध्ये पती-पत्नीमध्ये नेहमी वाद किंवा भांडण होत असते, त्या घरात नेहमी अशांतता असते आणि ही अशांतता देवी लक्ष्मीला अजिबात आवडत नाही.आणि ती अशा घरावर नेहमी कोपलेली असते. त्यामुळेच अशा घरांना तिचा आशीर्वाद मिळत नाही.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या