Chanakya Niti In Marathi: आजच्या काळातही क्वचितच असा कोणी असेल ज्याला आचार्य चाणक्याबद्दल माहिती नसेल. विसाव्या शतकातील सर्वात जाणकार आणि अभ्यासू व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख होती. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अनेक प्रकारच्या धोरणांची रचना केली होती ज्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या लोकांचा उल्लेख केला होता. या धोरणांमध्ये त्यांनी काही अशा लोकांचाही उल्लेख केला जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इतरांपेक्षा पुढे आहेत. चाणक्य नीतीनुसार, अशा लोकांना खूप लहान वयात यश मिळते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच लोकांबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया कोण आहेत ते लोक.
चाणक्य नीतीनुसार, अशा प्रकारचे लोक आपल्या जीवनात नेहमी इतरांपेक्षा पुढे राहतात, जे आपले मन नियंत्रित ठेवतात. सोप्या शब्दात समजून घेतल्यास, अशा प्रकारचे लोक त्यांच्या आयुष्यात नेहमी इतरांपेक्षा पुढे असतात जे त्यांचे मनाला आवरून ठेवतात. अशा व्यक्तींना जीवनात नेहमी यश मिळते. आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो जीवनात चुकीचे निर्णय घेतो. त्यामुळे त्याला यशसुद्धा मिळणे कठीण होते.
चाणक्य नीतीनुसार, जो व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण ठेवत नाही त्याची आयुष्यात कधीही यश किंवा प्रगती होत नाही. त्याचवेळी मनावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीला जीवनात नेहमी यश मिळते, मग तो कोणतेही लहान-मोठे काम करत असो.
चाणक्य नीतीनुसार, कोणतीही व्यक्ती जी स्वतःवर किंवा मनावर नियंत्रण ठेवत नाही. तो त्याच्या मनाचा गुलाम होतो. यामुळे त्याला आयुष्यात यश कधीच मिळत नाही. कारण तो मनाला वाटतात म्हणून चुकीचे निर्णय घेतो.
चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीचा स्वतःवर ताबा असतो तो जे काही काम करतो, तो योग्य मार्गाने आणि वेळेवर पूर्ण करू शकतो. असे लोक जीवनात नेहमी श्रीमंत राहतात. त्यांना मार्गात कोणत्याही अडचणी आल्या तरी ते डोक्याने शांतपणे विचार करून पुढे जातात. त्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या