Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांना महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी म्हटले जाते. आपल्या जीवनानुभवाच्या आणि ज्ञानाच्या आधारे त्यांनी ज्या गोष्टी शिकल्या, त्या त्यांनी आपल्या धोरणांद्वारे सामान्य लोकांनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून एखादी व्यक्ती आनंदी, समृद्ध आणि सन्माननीय जीवन जगू शकेल.चाणक्य यांनी प्रत्येक क्षेत्रात आपले ज्ञान समर्पित केले आहे. चाणक्याच्या धोरणांचा जीवनात अवलंब करून तुम्हीही प्रगतीचे शिखर गाठू शकता. आनंदी जीवन जगू शकता आणि समाजात मान-प्रतिष्ठा मिळवू शकता. चाणक्यने समाजातील प्रत्येक महत्वाच्या घटकाबाबत काही ना काही सूचना केल्या आहेत. याप्रमाणे पुरुषांना त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे ते आपण जाणून घेऊया.
अगदीच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, चाणक्य नीती हा मनुष्यांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. आचार्य चाणक्य यांनी नैतिकतेमध्ये वैयक्तिक जीवनापासून नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंधांपर्यंत सर्व मुद्द्यांवर त्यांचे विचार मांडले आहेत. नैतिकतेत नमूद केलेल्या गोष्टी लोकांना बऱ्याचदा कठोर वाटतात, परंतु या गोष्टी माणसाला योग्य आणि चुकीचा मार्ग सांगतात. आज प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आपल्या इच्छेनुसार यश मिळवायचे असते आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा तो जीवनाबद्दल निराशा व्यक्त करू लागतो. अशावेळी आपल्या कोणत्या गोष्टी चुकतात हे समजावून सांगण्यास आचार्य चाणक्य यांचे मूल्ये उपयोगी पडतात. या सर्व मूल्यांच्या संग्रहाला चाणक्य नीती असे संबोधले जाते.
चाणक्य नीतीनुसार आचार्य चाणक्य सांगतात की, पुरुषांनी पत्नीसोबत झालेला वाद किंवा घराशी संबंधित कोणतीही बाब बाहेरच्या लोकांना कधीही सांगू नये. यासोबतच पत्नीचा राग आल्यानंतर तिचे चारित्र्य, वागणूक किंवा सवयी कोणाला सांगू नका. लक्षात ठेवा की, तुम्ही या गोष्टी शेअर केल्यास त्या क्षणी काही होणार नाही. परंतु नंतर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
आचार्य चाणक्यच्या मते, पैसा तुम्हाला अर्थपूर्ण आणि सक्षम बनवतो. आजच्या काळात पैसा ही प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती किंवा पैशाशी संबंधित समस्या कोणालाही सांगू नका. असे केल्याने समाजात तुमचा आदर कमी होतो आणि जेव्हा इतरांना कळते की तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे, तेव्हा ते तुमच्यापासून दूर राहतात जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागू नयेत.
चाणक्य नीतीनुसार, जर याआधी एखाद्या गोष्टीबद्दल तुमचा अपमान झाला असेल, तर अशा गोष्टी कोणाशीही गमतीतदेखील शेअर करू नका. सहसा लोक विनोद करताना अशा गोष्टी जवळच्यांना सांगतात. पण अशा गोष्टी जितक्या जास्त गुप्त ठेवता तितकं चांगलं. म्हणूनच, जर तुम्ही कधीही अपमानाला सामोरे गेला असाल, तर ते तुमच्या मनात गुप्त ठेवा. जेणेकरून लोकांमध्ये तुमचं हसू होणार नाही. लोक फायद्यासाठी तुमच्या या सिक्रेटचा वापर करू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)