Qualities of Men That Attracts Women: आचार्य चाणक्य यांनी जीवनाशी संबंधित अशी अनेक धोरणे सांगितली आहेत, ज्यांचा अवलंब करून कोणतीही व्यक्ती आपले जीवन साधे आणि सुंदर बनवू शकते. चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये स्त्री-पुरुष संबंधांवरही बरीच चर्चा केली आहे. पुरुषांना कोणत्या प्रकारच्या स्त्रिया आवडतात, नवरा-बायकोचं नातं सुंदर होण्यासाठी काय करावं, काय करू नये; या सर्व बाबींची चर्चा त्यांनी आपल्या नीती शास्त्रात केली आहे. यासोबतच चाणक्य यांनी पुरुषांच्या गुणांविषयीही सांगितले आहे, जे पाहून स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होतात. चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्यानुसार पुरुषांच्या कोणत्या सवयी आहेत, ज्या पाहून स्त्रिया सर्वाधिक प्रभावित होतात आणि त्यांच्यावर मोहित होतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार स्त्रियांना साधे स्वभावाचे पुरुष जास्त आवडतात. शांत स्वभावाची माणसे संयमाने काम करतात आणि कोणतेही काम विचार करूनच करतात. अशा पुरुषांकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात. ज्या पुरुषांची निर्णय क्षमता चांगली असते, अशा पुरुषांकडेही स्त्रिया अधिक आकर्षित होतात.
पुरुषांच्या साधेपणाबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्त्वही स्त्रियांना खूप प्रभावित करते. प्रथम दर्शनी स्त्रिया पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देतात. मुलगा दिसायला देखणा नसला तरी त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक असेल तर स्त्रिया त्याच्या प्रेमात पडतात. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कशी वागते, ते कसे चालतात, उठतात आणि बोलतात; या सर्व गोष्टींचा स्त्रियांवर खूप परिणाम होतो. विशेषतः त्या व्यक्तीचे कोणत्याही स्त्रीशी वागणे कसे आहे, याकडे स्त्रिया सर्वप्रथम पाहतात.
महिलांना धाडसी पुरुष सर्वात जास्त आवडतात. स्त्रियांना त्यांच्यासाठी ढाल म्हणून उभे राहणारे पुरुष आवडतात. ज्यांच्याबरोबर ते स्वत:ला सर्वात सेफ आणि सिक्योर समजतात आणि ज्यांच्याबरोबर ते धाडस ही करू लागतात. डरपोक आणि लोकांसमोर दबणारे पुरुष स्त्रियांना कमी पसंत पडतात.
अहंकारी पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत. स्त्रियांना नेहमीच अहंकाराची भावना नसलेले पुरुष आवडतात. चाणक्य यांच्या मते, कोणतेही नाते प्रेमाने निभावण्यासाठी व्यक्तीमध्ये अहंकाराची भावना असू नये. एखाद्या व्यक्तीला अहंकार झाला तर त्याचा परिणाम नात्यावरही होतो. त्यामुळेच स्त्रियांना इगोइस्टिक पुरुष आवडत नाहीत.
महिलांना मेहनती आणि प्रामाणिक पुरुष सर्वात जास्त आवडतात. जे पुरुष आपल्या नात्यात प्रामाणिक असतात, काहीही लपवत नाहीत आणि सत्याने जीवन जगतात, असे पुरुष स्त्रियांना जास्त आवडतात. यासोबतच महिलांना मेहनती पुरुष आवडतात. महिलांना आळशी आणि निष्काळजी पुरुष आवडत नाहीत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)