Chanakya Niti In Marathi: आजही चुकूनच कोणी असेल ज्याला आचार्य चाणक्यांबाबत माहित नसेल. कारण बहुतांश लोक त्यांच्याच नीतीनुसार कार्य करतात. आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील अत्यंत हुशार आणि विद्वान व्यक्तीमत्व होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अनेक प्रकारची धोरणे रचली आहेत. असे म्हटले जाते की, जेव्हा एखादी व्यक्ती आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करते किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते तेव्हा त्याला यशस्वी आणि समृद्ध जीवन मिळू शकते.या धोरणांमध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक पैलूंबद्दल सांगितले आहे आणि त्याबद्दल सल्ला दिला आहे. आज आम्ही तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या व्यक्तीने चुकूनही इतर कोणाशीही शेअर करू नयेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा तुम्हाला धनाची हानी होते तेव्हा तुम्ही ते इतर कोणाशीही शेअर करू नये. जर तुम्ही अशा संवेदनशील गोष्टी दुसऱ्या कोणाशी तरी शेअर केल्यात, तर आयुष्यात ती व्यक्ती तुमची चेष्टा करू शकते आणि तुम्हीही लोकांसमोर हसण्यास पात्र बनू शकता. त्यामुळे धन हानी कोणालाही सांगू नये.
आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही तुमच्या कौटुंबिक गोष्टी तुमच्या मित्र किंवा बाहेरील लोकांसोबत कधीही शेअर करू नये. जर तुम्ही अशी चूक केलीत तर तुमचा जीवनात अपमान होऊ शकतो. कुटुंबीयांची निंदा केल्यास ती व्यक्ती तुमचा पुढे फायदा घेऊ शकतो. चारचौघात तुमच्यावर हसू शकतो. त्यामुळे आपल्या खाजगी गोष्टी कोणालाही सांगू नये.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर कोणी तुमची फसवणूक केली असेल, तर अशा गोष्टी इतर कोणाशीही शेअर करू नका. बऱ्याच वेळा, तुम्ही अशा गोष्टी दुसऱ्या कोणाशी शेअर केल्यास, ती व्यक्ती तुम्हाला नंतरच्या आयुष्यात निराश करू शकते.
आमचे दु:ख आमचेच आहे असे वडीलधारी लोक नेहमी सांगतात. त्याचप्रमाणे आचार्य चाणक्य यांच्या मते, अनेक वेळा समोरची व्यक्ती आपल्याबद्दल सहानुभूती दाखवेल या विचाराने आपण आपले दु:ख इतरांसोबत शेअर करतो. पण, असे अनेकदा घडत नाही. अनेक वेळा असंही होतं की समोरची व्यक्ती तुमची चेष्टा करते. किंवा इतरांना सांगून तुम्हाला कमीपणा दाखवते. त्यामुळे अशा गोष्टी चुकूनही कोणाशी शेअर करू नये.