Chana Dal Halwa : वसंत पंचमीला देवी सरस्वतीला अर्पण करा पारंपरिक डाळीचा हलवा! नोट करा रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chana Dal Halwa : वसंत पंचमीला देवी सरस्वतीला अर्पण करा पारंपरिक डाळीचा हलवा! नोट करा रेसिपी

Chana Dal Halwa : वसंत पंचमीला देवी सरस्वतीला अर्पण करा पारंपरिक डाळीचा हलवा! नोट करा रेसिपी

Feb 02, 2025 11:19 AM IST

Chana Dal Halwa Recipe : वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात. या दिवशी देवी सरस्वती मातेला नैवेद्य अर्पण करण्यासाठी चणा डाळीचा हलवा बनवू शकता.

चना दाल हलवा
चना दाल हलवा

Chana Dal Halwa Recipe : वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करताना देवीला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात. अशावेळी एखाद्या पिवळ्या रंगाचा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केला की, देवी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे मानले जाते. या खास दिवशी तुम्ही चणा डाळीचा हलवा बनवू शकता. वसंत पंचमीच्या दिवशी आपण देवी सरस्वतीच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीचा स्वादिष्ट चणा डाळ हलवा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी... 

चणाडाळीचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

२ कप चणाडाळ

२ कप साखर

२ कप पाणी

७-८ चमचे तूप

थोडे केशर

१ टीस्पून वेलची पूड

बदाम

काजू

मनुका

Ladoo Recipe : माघ गणेश जयंतीच्या निमित्ताने बाप्पासाठी बनवा खास कणकेचे लाडू! लिहून ठेवा रेसिपी

चणा डाळीचा हलवा बनवण्याची कृती

> डाळीचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ नीट धुवावी. डाळ धुतान हातांनी स्वच्छ चोळून घ्या. 

> नंतर चणाडाळ स्वच्छ पाण्यात दोन तास भिजत ठेवा. भिजवलेली चणा डाळ प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घालून शिजवून घ्या. 

> डाळ चांगली शिजली की, तिला थोडी घोटून बारीक करुण घ्या. 

> आता एका कढईत तूप गरम करून त्यात घोटून घेतलेली चणाडाळ घाला. आता चणाडाळ घट्ट होईपर्यंत नीट परतून घ्या.

> डाळ भांड्याला चिकटणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी ती मंद ते मध्यम आचेवरच भाजून घ्या. जेव्हा डाळीचा रंग बदलू लागेल आणि ती घट्टसर होताना दिसू लागेल, तेव्हा त्यात केशर घालून चांगली मिक्स करा. 

> नंतर त्यात साखर आणि वेलची पूड घाला. चांगले मिक्स करून शिजू द्या. 

> हलवा शिजत असताना त्यात बदाम आणि काजू बारीक चिरून घाला. नंतर त्यात मनुकादेखील घाला. 

> हे मिश्रण चांगले मिक्स करा आणि नंतर वरून ड्रायफ्रूट्सनी सजवून भोग तयार करा आणि प्रसाद सर्वांना वाटून द्या.

वसंत पंचमीचे महत्त्व

वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते. कारण, देवी सरस्वती ज्ञान, कला, संगीत आणि विद्येची प्रतीक मानली जाते. या सणाच्या निमित्ताने विविध कलेचे, साहित्याचे आणि संगीताचे महत्त्व वाढवले जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचा कपडे परिधान करण्याची परंपरा देखील आहे, कारण पिवळा रंग वसंत ऋतूशी संबंधित असतो आणि तो समृद्धी, सुख आणि समृद्ध जीवनाचे प्रतीक मानला जातो.

Whats_app_banner