Chakali Recipe: कधी मऊ तर कधी कडक होते चकली? या सोप्या रेसिपीने बनेल बाजारासारखी खुसखुशीत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chakali Recipe: कधी मऊ तर कधी कडक होते चकली? या सोप्या रेसिपीने बनेल बाजारासारखी खुसखुशीत

Chakali Recipe: कधी मऊ तर कधी कडक होते चकली? या सोप्या रेसिपीने बनेल बाजारासारखी खुसखुशीत

Published Sep 15, 2024 10:55 AM IST

Easy way to make chakli: चकली ही मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या राज्यांची आवडती चटपटीत डिश असली तरी त्याच्या चवीमुळे चकली सर्वत्र पसंतीस येऊ लागली आहे.

simple chakali recipe-चकली बनवण्याची सोपी पद्धत
simple chakali recipe-चकली बनवण्याची सोपी पद्धत (shutterstock)

Tips for making crispy chakli:  दिवाळीच्या सणात खाण्यापिण्याची प्रचंड रेलचेल असते. त्यामुळेच दिवाळीला घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. नमकीनमध्ये असणारी चकली लोकांना खूप आवडते. चकली ही मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या राज्यांची आवडती चटपटीत डिश असली तरी त्याच्या चवीमुळे चकली सर्वत्र पसंतीस येऊ लागली आहे. परंतु दिवाळीशिवायसुद्धा अनेकांना नेहमीच चहासोबत किंवा तसेच चकली खाणे आवडते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात दिवाळी व्यतिरिक्त नेहमीच चकली बघायला मिळते.

चकली बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या डाळींचा वापर केला जातो. यामुळेच चकली आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे. परंतु अनेकांना चकली बनवताना विविध अडचणी येतात. कधी चकली मऊ पडते तर कधी चकली एकदम कडक बनते, तर कधी चकली तुटते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीची चकली बनवण्याची सोपी आणि पारंपरिक रेसिपी सांगणार आहोत जी चवीला अत्यंत स्वादिष्ट असेल.

चकली बनवण्यासाठी साहित्य-

-तांदूळ -५०० ग्रॅम

-मूग डाळ - १५० ग्रॅम

-चना डाळ - २५० ग्रॅम

-उडदाची डाळ - १५० ग्रॅम

-धने पावडर -२ चमचे

-जिरे पावडर - २ चमचे

-लाल मिरची पावडर - २ चमचे

-लोणी - २टेस्पून

-तेल - तळण्यासाठी

-मीठ - चवीनुसार

चकली बनवण्याची सोपी रेसिपी-

चकली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानांच खूप आवडते. चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि चणा डाळ नीट स्वच्छ करून घ्या आणि नंतर वेगवेगळ्या भांड्यात ७-८ तास भिजत ठेवा. या वेळेनंतर, गाळणीच्या साहाय्याने जास्तीचे पाणी काढून टाका आणि कोरडे करण्यासाठी बाजूला ठेवा. चारही डाळी नीट वाळल्यावर ते कढईत ठेवा आणि मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

यानंतर, सर्व साहित्य मिक्सरच्या मदतीने एक एक करून बारीक करा आणि पीठ तयार करा. तयार पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवा आणि चांगले मिसळा. आता त्यात थोडे तांदळाचे पीठ आणि सर्व मसाले घालून नीट मळून घ्या. त्यानंतर हे मळलेले पीठ चकली बनवण्याच्या साच्यात टाकून सुती कापडावर किंवा ताटात चकली बनवा. सर्व पिठाच्या चकल्या त्याच पद्धतीने बनवा आणि थोडा वेळ सेट करा. आता एका खोलगट कढईत तेल ठेऊन मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात चकल्या घालून तळून घ्या. चकल्या दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. यानंतर तळलेल्या चकल्या एका प्लेटमध्ये काढा. चकल्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवून द्या.

Whats_app_banner