Fruit Chaat Recipe: चैत्र नवरात्रीमध्ये अनेक जण ९ दिवस उपवास करतात. उन्हाळ्याच्या दिवसात उपवास केल्याने शरीर डिहायड्रेट होणे, थकवा जाणवणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे उपवास करताना आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते. शरीर हायड्रेट राहावे यासाठी फळ खाणे हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला साधी फळे खायला आवडत नसतील तर तुम्ही फ्रेश फ्रूट चाट बनवू शकता. हे तुम्हाला उपवासाच्या काळात लगेच एनर्जी देईल. तसेच तुमची संध्याकाळी स्नॅक्स खाण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे फ्रूट चाट.
- सफरचंद
- संत्री
- डाळिंब
- पपई
- केळी
- काकडी
- लिंबाचा रस
- सैंधव मीठ
- काळी मिरी पावडर
- लाल तिखट
- भाजलेल्या जिऱ्याची पावडर
उपवासासाठी फ्रूट चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम सफरचंद, काकडी यांसारखी फळे नीट धुवून घ्या. नंतर ज्या फळांची साल काढायची आहे त्याचे साल काढून त्याचे तुकडे करा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात आंबा, टरबूज, खरबूज, चिकू या फळांचा सुद्धा समावेश करू शकता. ही सर्व फळे कापून घ्या. नंतर डाळिंब सोलून त्याचे दाणे काढून घ्या. आता सर्व फळे एका मोठ्या बाऊलमध्ये घ्या. आता त्यात सैंधव मीठ, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, लाल तिखट आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घाला. सर्व नीट मिक्स करा. तुमचे फ्रूट चाट सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. हे जास्त वेळ ठेवू नका. लगेच खा.