Pumpkin Halwa Recipe: नवरात्रीच्या उपवासात काही गोड बनवायचे असेल जे चवदार तसेच आरोग्यदायी आहे आणि त्यात साखरेचा वापर कमी केला आहे तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. भोपळ्याचा हलवा पटकन तयार होतो आणि खायला टेस्टी आणि हेल्दी देखईल आहे. बाजारातून पिवळा आणि पिकलेला भोपळा विकत घ्या आणि चविष्ट हलवा तयार करा. हा हलवा खूप कमी मेहनतीत लवकर तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी भोपळ्याचा हलवा कसा बनवायचा.
- अर्धा किलो पिवळा भोपळा
- १०० ग्रॅम गूळ
- ४-५ वेलची
- दोन कप दूध
- दोन ते तीन चमचे देशी तूप
सर्वप्रथम भोपळा नीट धुवून त्याचे साल काढून घ्या. पिवळ्या भोपळ्याची साल खूप कडक असते. अशा परिस्थितीत ते काढणे आवश्यक आहे. आता भोपळ्याचे लहान तुकडे करा. नंतर पॅनमध्ये तीन ते चार चमचे देशी तूप घालून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात भोपळ्याचे तुकडे टाका आणि थोडा वेळ मंद आचेवर भाजून घ्या. नंतर गॅस मंद करून झाकण ठेवून शिजवा. जेव्हा भोपळा तुपात चांगला शिजला आणि वितळायला लागतो तेव्हा त्यात गूळ घालून चमच्याच्या मदतीने चांगले मॅश करा. तसेच बारीक वेलची पूड घालावी.
गॅसच्या दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये दूध शिजवून घट्ट होऊ द्या. दूध रबडीसारखे घट्ट झाले की गॅस बंद करा. आता ही रबडी तयार हलव्यावर घाला आणि थंड होऊ द्या. तुमचा भोपळ्याचा हलवा तयार आहे. सर्वांना सर्व्ह करा.