Chaitra Navratri Fasting Tips: मधुमेही रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासात लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chaitra Navratri Fasting Tips: मधुमेही रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासात लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य

Chaitra Navratri Fasting Tips: मधुमेही रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासात लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य

Apr 09, 2024 03:23 PM IST

Diabetes Care Tips: जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि नवरात्रीचे उपवास करायचे असतील तर तुमच्या श्रद्धेसोबत चांगले आरोग्य राखण्यासाठी नवरात्रीच्या उपवासाशी संबंधित या गोष्टींचे पालन करा.

Chaitra Navratri Fasting Tips: मधुमेही रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासात लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य
Chaitra Navratri Fasting Tips: मधुमेही रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासात लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य

Chaitra Navratri Fasting Tips for Diabetic Patients: चैत्र नवरात्रीचा उत्सव आजपासून सुरू झाला आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीचे भक्त तिच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. नवरात्रीच्या काळात पाळले जाणारे उपवास केवळ श्रद्धाच नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक फायदेही देतात. उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीर पूर्णपणे डिटॉक्स होते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि नवरात्रीचे उपवास करायचे असेल तर तुमच्या श्रद्धेसोबत आरोग्य चांगले राहण्यासाठी नवरात्रीच्या उपवासाशी संबंधित या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

नवरात्रीच्या उपवासात मधुमेही रुग्णांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

डॉक्टरांचा सल्ला

हाय इन्सुलिनचा डोस घेणाऱ्या मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नवरात्रीचा उपवास करू नये. असे केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने घसरते. त्यामुळे रुग्णाला किडनी, यकृत, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका असू शकतो.

कुट्टूचे पीठ

मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीच्या उपवासात कमी जीआय कार्बोहाइड्रेट कुट्टूच्या पिठाचे सेवन करू शकतात. हे पीठ खाल्ल्याने कार्बोहायड्रेट्स हळूहळू बाहेर पडतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि चयापचय देखील वाढते.

हायड्रेटेड राहणे महत्वाचे

मधुमेहाच्या रुग्णांना उपवास दरम्यान डिहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन टाळण्यासाठी मधुमेही रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासात ताक, लिंबू पाणी आणि नारळ पाणी यांचा आहारात समावेश करावा. असे केल्याने रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाण्यापासून वाचवता येते.

प्रोबायोटिक्स

नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्या लोकांसाठी दही हे सर्वोत्तम अन्न आहे. उपवास सोडल्यानंतर एक कप दही अवश्य सेवन करावे. यामुळे पोट शांत होण्यास मदत होते, ॲसिडिटी आणि गॅस टाळता येतो. याशिवाय ताक, दही, पनीर यांसारख्या लो फॅट डेअरी प्रोटीनचा आहारात समावेश करा. जेणेकरून सर्व प्रकारच्या साखरेची लालसा कमी करता येईल आणि तुमची एनर्जी लेव्हल दिवसभर चांगली राहते.

शुगर फ्री ड्रिंक

मधुमेही रुग्णांनी नेहमी शुगर फ्री ड्रिंकने उपवास सोडावा. गोड पेये तुमच्या रक्तातील साखर आणखी वाढवू शकतात. फॅट, सोडियम आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांपासून दूर रहा.

नवरात्रीच्या उपवासात मधुमेही रुग्णांनी या चुका करू नये

- जास्त वेळ उपाशी राहू नका

- जास्त चहा पिणे टाळा

- औषधे वेळेवर घ्या

- तळलेले अन्न खाणे टाळा

- उपवास करण्यापूर्वीच्या जेवणाची काळजी घ्या

- डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner