Cervical Spondylosis: सतत लॅपटॉपवर बसून मान आणि खांदे प्रचंड दुखतात? 'हे' घरगुती उपाय लगेच देतील आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cervical Spondylosis: सतत लॅपटॉपवर बसून मान आणि खांदे प्रचंड दुखतात? 'हे' घरगुती उपाय लगेच देतील आराम

Cervical Spondylosis: सतत लॅपटॉपवर बसून मान आणि खांदे प्रचंड दुखतात? 'हे' घरगुती उपाय लगेच देतील आराम

Nov 30, 2024 01:23 PM IST

Shoulder & neck pain remedies marathi: जास्त वेळ एकाच स्थितीत बसून सतत काम करणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. या आजारात मान आणि खांद्याभोवती तीव्र वेदना होतात.

Shoulder & neck pain remedies marathi (Spondylosis )
Shoulder & neck pain remedies marathi (Spondylosis ) (freepik)

Spondylosis home remedies in marathi:  आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनेक लोक स्पॉन्डिलाइटिसच्या समस्यांनी त्रस्त आहेत. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ एकाच स्थितीत बसून सतत काम करणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. या आजारात मान आणि खांद्याभोवती तीव्र वेदना होतात. कधी-कधी हे दुखणे इतके वाढते की मान हलवायलाही त्रास होतो. याशिवाय, चक्कर येणे, मळमळ आणि उलट्यासारखी लक्षणे देखील सर्वाइकल स्पॉन्डिलाइटिसच्या बाबतीत दिसून येतात. मानदुखीच्या वेदनेपासून आराम मिळण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधे घेतात. पण जर तुम्हाला हवे असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही खांदे आणि मानदुखीच्या वेदनेपासून आराम मिळवू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे मानदुखीच्या वेदनेपासून आराम मिळू शकतो. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

आले

मानदुखीच्या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा वापर करू शकता. यात अँटी इंफ्लीमेंट्री गुणधर्म आहेत. जे वेदना आणि सूज दूर करण्यात प्रभावी आहेत. यासाठी आल्याचे तेल प्रभावित भागावर लावून काही वेळ मसाज करा. यामुळे स्नायूंचा कडकपणा दूर होईल आणि वेदनापासून आराम मिळेल.

हळद-

हळद खांदे आणि मानदुखीच्या वेदनेपासून आराम देण्यासाठी देखील प्रभावी आहे. यात अँटी इंफ्लीमेंट्री गुणधर्म आहेत. जे वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला मानदुखीच्या वेदनेने त्रास होत असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्या. याचे नियमित सेवन केल्यास लवकर आराम मिळतो.

शेकणे-

कोमट पाण्याने त्या-त्या भागांवर शेक दिल्याने मानदुखीच्या वेदनेपासून बराच आराम मिळू शकतो. यासाठी गरम पाण्यात रॉक मीठ घालून मिक्स करा. त्यात एक टॉवेल भिजवा आणि वेदनादायक भागावर १५ ते २० मिनिटे लावा. असे केल्याने तुम्हाला लवकरच फरक जाणवेल.

लसूण-

मानदुखीच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही लसूण वापरू शकता. यात अँटी इंफ्लीमेंट्री गुणधर्म असतात, जे वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या १ ते २ पाकळ्या खाऊ शकता. याशिवाय तुम्ही मोहरीच्या तेलात लसूण शिजवून या तेलाने मानेला मसाज करू शकता.

व्यायाम आणि योगासने-

खांदे आणि मानदुखीच्या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही नियमितपणे व्यायाम आणि योगासने करावीत. यासाठी तुम्ही आरोग्य तज्ज्ञ किंवा ट्रेनरची मदत घेऊ शकता. रोज व्यायाम आणि योगा केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होतात. याशिवाय आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner