Deepika Padukone Gym Trainer Yasmin: दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ सारख्या अनेक टॉप बॉलिवूड अभिनेत्रींची फिटनेस ट्रेनरवयाच्या पन्नाशीनंतरही अगदी तरुण आणि सुंदर दिसते. या वयातही फिटनेस राखण्याची आणि तरुण दिसण्याची तिचे फिटनेस सीक्रेट्स तिने शेअर केले आहेत. सेलिब्रेटी ट्रेनर असणारी यास्मिन जवळपास ५४ वर्षांची आहे. परंतु तिच्या फिटनेसवरून तिचे वय अजिबात दिसत नाही. खरं तर, तिला खूप विचारलं जातं की नशिबाने ती इतकी छान दिसते का? परंतु यास्मिनने वयाच्या पन्नाशीतही तरुण दिसण्याचे आपले रहस्य इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. चला तर मग पाहूया काय आहे हे रहस्य...
यास्मिनने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर आहे की, “माझी आजची रील फक्त जिममध्ये वजन उचलण्यापेक्षा जास्त आहे - ती स्वतःला वर उंचावण्याबद्दल आहे. कोणत्याही स्त्रीसाठी, विशेषत: आमच्यासाठी ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी, हे नशीब किंवा शरीराच्या प्रकाराबद्दल नाही, ते लवचिकता आणि दृढनिश्चयाबद्दल आहे. प्रत्येक अपयश हे आणखी एक पाऊल पुढे जाण्यासाठी आहे आणि प्रत्येक कसरत ही ताकदीचा पुरावा आहे. आयुष्यात कष्ट करणे स्वीकारा, आपल्या सामर्थ्याचे मालक व्हा आणि आपल्या प्रवासातील सौंदर्य कधीही विसरू नका,” असे लिहीत त्याने सर्वांना फिटनेससाठी कसरत करण्याचा सल्ला दिला आहे.
यास्मिनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फिटनेस राखण्यासाठी विविध वर्कआउट रुटीन करताना दिसून येत आहे. यामध्ये ती धावण्यापासून, पुशअप्स, पायलेट्सपर्यंत सर्वकाही ट्राय करत आहे. ट्रेनरने रीलमध्ये सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर देत म्हटले आहे कि, ''हे नशीब नाही, हे कठोर परिश्रम आणि शिस्त आहे ज्यामुळे मी वयाच्या पन्नाशीनंतरही इतकी तरुण आणि फिट आहे.
ती पुढे म्हणते “प्रत्येक लोक, प्रत्येक दिवशी, दररोज. सातत्य, प्रयत्न आणि स्वतःला पुढे ढकलण्याची मर्यादा आवश्यक आहे. येथे नशीब नाही, मेहनत आहे” तिच्या रीलवरील मजकूर अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये ती हवाई योगासने करताना दिसते. ट्रेनरने तिच्या इंस्टाग्राम कुटुंबाला चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक गोष्टी लक्षात ठेवण्याची आठवण करून दिली आहे- "आणि आवश्यक गोष्टी विसरू नका - जसे की योग्य खाणे, विश्रांती घेणे, झोप आणि लवचिकता," याबाबतही सांगितले आहे.
संबंधित बातम्या