Self Care for Health and Happiness: जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षी सेल्फ केअर महिना साजरा केला जात आहे, ज्याने आरोग्य आणि कल्याणासाठी सेल्फ केअर हस्तक्षेपांवर प्रथम जागतिक मार्गदर्शक तत्त्वे सुरू केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वाचे प्रकाशन हे डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शनात एक मोठे बदल होते, ज्यामुळे समुदाय, प्राथमिक काळजी आणि आरोग्य प्रणाली यांना जोडण्याचा मार्ग मोकळा झाला. २४ जून पासून सुरु झालेल्या या महिन्याची सांगता २४ जुलै रोजी सेल्फ केअर डे ने होणार आहे.
आपण सगळे अतिशय व्यस्त असतो आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढणं कठीण होतं. पण आपल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच हा महिना आपल्याला स्वतःची काळजी घेण्याचं महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यासाठी काही वेळ काढण्यासाठी प्रोत्साहित करतो. सेल्फ केअर हे स्वार्थीपणा नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी गरजेचं आहे. म्हणूनच, या महिन्यात स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढा आणि निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा आनंद घ्या.
दररोज थोडा वेळ व्यायामासाठी द्या. चालणे, धावणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा. व्यायामामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
फळं, भाज्या, धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असलेला पौष्टिक आहार घ्या. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतील आणि आपण एनर्जेटिक राहाल.
दररोज रात्री ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. झोपेमध्ये आपले शरीर आणि मन दोन्ही विश्रांती घेतात आणि पुन्हा चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी तयार होतात.
तणाव आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. योग, ध्यान किंवा संगीत ऐकणे यासारख्या तणाव कमी करण्याच्या तंत्रांचा सराव करा.
आपल्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवल्याने आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो.
नवीन भाषा शिकणे, नवीन कौशल्य शिकणे किंवा नवीन ठिकाणी प्रवास करणे यासारख्या गोष्टी करून स्वतःला आव्हान द्या.
वाचन, चित्रकला, संगीत ऐकणे किंवा इतर कोणत्याही आवडीच्या कामांसाठी, छंद पूर्ण करण्यासाठी वेळ द्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या