Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या

Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या

May 02, 2024 11:23 PM IST

Education Tips: शैक्षणिक वाटचाल करताना एखादा कोर्स ऑनलाइन करावा की ऑफलाइन करावा असा संभ्रम अनेक वेळा विद्यार्थ्यांनामध्ये होतो. एमबीए आणि पीजीडीएमच्या बाबतीत काय बेस्ट आहे हे जाणून घ्या.

Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या
Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या (unsplash)

Best Way for Navigating MBA and PGDM Landscape: व्‍यावसायिक शिक्षणाच्‍या विकसित होत असलेल्‍या युगामध्‍ये संभाव्‍य विद्यार्थ्‍यांमध्‍ये ऑनलाइन एमबीए किंवा पीजीडीएम करावे की ऑन-कॅम्पस प्रोग्राम याबाबत विचारविनिमय सुरू आहे. प्रत्‍येक मार्ग विशिष्‍ट फायदे देण्‍यासह विविध व्‍यक्‍तींना आवाहन करतो. तुमच्‍या करिअरमधील महत्त्वाकांक्षा व जीवनशैलीला अनुसरून सर्वोत्तम मार्ग निर्धारित करण्‍यास मदत करण्‍यासाठी ऑनलाइन आणि ऑन-कॅम्‍पस एमबीए किंवा पीजीडीएम प्रोग्राम्‍सच्‍या बारकाव्‍यांबाबत येथे जाणून घ्या. पीजीडीएम ऑनलाइन प्रोग्राम एसपीजेआयएमआर, भारतचे अध्यक्ष तथा ऑपरेशन्‍स अँड सप्‍लाय चेन अँड क्‍वॉन्टिटेटिव्‍ह मेथड्सचे प्रोफेसर देबमल्‍या चॅटर्जी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

एमबीए/पीजीडीएम प्रोग्रामचे फायदे

ऑनलाइन की ऑन-कॅम्‍पस प्रोग्राम्‍सच्‍या बारकाव्‍यांबाबत विश्‍लेषण करण्‍यापूर्वी एमबीए/पीजीडीएम करण्‍याच्‍या व्यापक फायद्यांबाबत विचार करणे महत्त्वाचे आहे. हे प्रोग्राम्‍स करिअरला प्रगतीच्‍या दिशेने घेऊन जाण्‍यासाठी प्रबळ उत्‍प्रेरक आहेत, तसेच व्‍यक्‍तींना आजच्‍या व्यावसायिक क्षेत्राच्‍या गुंतागुंतींमधून नेव्हिगेट करण्‍यासाठी महत्त्वाचे असलेली बहुमूल्‍य कौशल्‍ये, ज्ञान व नेटवर्क्‍ससह सक्षम करतात. तुमचे बढती मिळण्‍याचे ध्‍येय असो, करिअरमध्‍ये प्रगती करण्‍याचा प्रयत्‍न असो किंवा स्‍वत:चा उद्योजकीय उद्यम सुरू करण्‍याची महत्त्वाकांक्षा असो एमबीए/पीजीडीएम तुम्‍हाला तुमच्‍या ध्‍येयांकडे घेऊन जाण्यास त्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी आवश्‍यक साधने व माहिती देऊ शकतात.

एमबीएम/पीजीडीएम प्रोग्राम्‍सचे प्रकार

गेमचेंजर ऑनलाइन क्‍वॉलिटी प्रोग्राम:

पारंपारिकरित्‍या ऑन-कॅम्‍पस एमबीए/पीजीडीएम सुवर्ण मानक राहिले आहे, जे प्रतिष्ठित संस्‍थांच्‍या आवारात दर्जेदार शिक्षण देतात. पण उदयास आलेल्‍या ऑनलाइन एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम्‍सनी या पद्धतीमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. दर्जाबाबत तडजोड न करता स्थिरता व उपलब्‍धतेसह महत्त्वपूर्ण पर्याय देतात. आज प्रतिष्ठित युनिव्‍हर्सिटीज आणि बिझनेस स्‍कूल्‍स ऑनलाइन एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम्‍स देत आहेत, जे ऑन-कॅम्‍पस प्रमाणे अभ्‍यासक्रम आणि प्राध्‍यापक वर्गाचे कौशल्‍य देतात. या आमूलाग्र परिवर्तनाने भौगोलिक अडथळ्यांना दूर करत आणि जगभरातील महत्त्वाकांक्षी व्‍यवसाय प्रमुखांच्‍या विविध गरजांची पूर्तता करत दर्जेदार व्‍यावसायिक शिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून दिले आहे.

ऑनलाइन आणि ऑन-कॅम्‍पस एमबीए/पीजीडीएममधील फरक

ऑनलाइन व ऑन-कॅम्‍पस एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम्‍सचे व्यवसाय क्षमतेला चालना देण्‍याचे समान उद्दीष्‍ट असले तरी त्‍यांचे वितरण आणि अनुभवामध्‍ये मोठा फरक आहे. ऑन-कॅम्‍पस प्रोग्राम्‍स उच्‍च-स्‍तरीय प्राध्‍यापक वर्गासह समोरासमोर परस्‍पर संवादांवर भर देतात, सहकाऱ्यांसोबत सहयोग, नेटवर्किंग संधी व अभ्‍यासेत्तर सहभागांसह सानुकूल अध्‍ययन वातावरणाची निर्मिती करतात. भारतात युनिव्‍हर्सिटी/संस्‍थेने प्रदान केलेल्‍या करिअर सेवा इच्छुकांच्या संस्‍था निवडण्‍याच्‍या निर्णयामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. याउलट ऑनलाइन प्रोग्राम्‍स व्हर्च्युअल व्‍यासपीठांचा फायदा घेत लेक्‍चर्स देतात, चर्चासत्रांची सुविधा देतात आणि कोर्स वर्कवर प्रशासकीय देखरेख ठेवतात. ज्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना व्‍यावसायिक व वैयक्तिक कटिबद्धतांसह त्‍यांच्‍या शिक्षणामध्‍ये संतुलन राखण्यास स्थिरता मिळते. ऑनलाइन व ऑन-कॅम्‍पस दरम्‍यान निवड वैयक्तिक प्राधान्‍यक्रम, अध्‍ययन शैली आणि जीवनशैली संदर्भातील अडथळे यांवर अवलंबून असते.

संरचित एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम्‍स यशाचे मार्ग आहेत का की एमओओसी फायदेशीर ठरू शकते?

व्‍यावसायिक शिक्षण क्षेत्रात सहभागी त्‍यांची कौशल्‍ये अपग्रेड करण्‍यासाठी संरचित एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम्‍स आणि मॅसिव्‍ह ओपन ऑनलाइन कोर्सेस (एमओओसी) यामधून निवड करण्‍याच्‍या दुविधेत सापडतात. एमओओसी सुलभता प्रदान करतात तर संरचित प्रोग्राम्‍स सर्वसमावेशक अध्‍ययनाला चालना देणारे फ्रेमवर्क प्रदान करतात. एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम्‍स विविध विषयांना कव्‍हर करणारे अभ्‍यासक्रम बारकाईने तयार करतात. कौशल्‍य संपादनांसाठी सर्वोत्तम रोडमॅप प्रदान करतात. हे प्रोग्राम्‍स समकालीन व असमकालीन अध्‍ययनामध्‍ये संतुलन राखतात, रिअल-टाइम परस्‍परसंवाद देतात, तसेच अभ्यासासाठी विविध वेळापत्रकांची सुविधा देतात. साप्ताहित सहभागाचे तास शिस्‍त लावतात आणि अध्‍ययन निष्‍पत्ती सानुकूल करतात. असाइनमेंट्ससह केस स्टडी व सादरीकरणे सैद्धांतिक संकल्‍पना दृढ करतात आणि व्यावहारिक उपयोजनाला चालना देतात. संरचित प्रोग्राम्समध्ये गट प्रकल्‍प टीमवर्क व नेतृत्‍व कौशल्‍यांना प्रेरित करतात, वास्‍तविक विश्‍वातील गतीशीलतांचा अनुभव देतात. याउलट एमओओसीमध्‍ये फ्रेमवर्क्‍स आणि परस्परसंवादी घटकांचा अभाव दिसून येतो. ज्‍यामुळे प्रेरणा व प्रगतीमध्‍ये संभाव्‍य अडथळा येऊ शकतो. विद्यार्थ्‍यांना स्वावलंबीपणा व वेळेचे व्‍यवस्‍थापन यांमध्‍ये संघर्ष करावा लागू शकतो. ज्‍यामुळे संपूर्ण अध्‍ययन अनुभव मिळत नाही. एमओओसी औपचारिक शिक्षणाला पूरक असण्यासोबत व्‍यापक संसाधने देत असले तरी संरचित प्रोग्राम्‍सप्रमाणे वैयक्तिक साह्य प्रदान करू शकत नाही. शेवटी, निवड वैयक्तिक प्राधान्‍यक्रम, उद्दीष्‍टे आणि इच्छित सहभाग स्‍तरांवर अवलंबून असते.

समकालीन शिक्षणाच्‍या तुलनेत ऑनलाइन एमबीए/पीजीडीएम प्रोग्रॉम्‍स नुकतेच पदवीधर झालेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी नाही आहेत. याउलट ते कौशल्‍ये अधिक निपुण करण्‍यासोबत करिअर प्रगतीपथावर नेण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या, तसेच व्‍यावसायिक कटिबद्धता कायम राखणाऱ्या अनुभवी श्रमजीवी व्‍यावसायिकांच्‍या वैविध्‍यपूर्ण समूहाचे लक्ष वेधून घेतात. ऑनलाइन प्रोग्राम्‍सचे आकर्षण श्रमजीवी व्‍यावसायिकांचे व्‍यस्‍त वेळापत्रक सामावून घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे, जे असमकालीन अध्ययन मॉड्यूल्‍स आणि कधीही, कुठेही परस्‍परसंवादी व्हर्ज्युअल क्‍लासरूम्‍स देतात. तसेच ऑनलाइन एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम्‍स पारंपारिक ऑन-कॅम्‍पस शिक्षणाशी संलग्‍न असलेल्‍या आर्थिक अडथळ्यांना दूर करतात. ज्‍यामुळे विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमींमधील व्‍यक्‍तींना दर्जेदार व्‍यावसायिक शिक्षण उपलब्‍ध होते.

तसेच ऑनलाइन प्रोग्राम्‍स भौगोलिक अडथळ्यांना दूर करत विद्यार्थ्‍यांना विविध सांस्‍कृतिक, व्‍यावसायिक व भौगोलिक पार्श्‍वभूमींमधील सहकाऱ्यांसोबत सहयोग करण्यासाठी सक्षम करत विविधतेला चालना देतात. ही विविधता अध्‍ययन अनुभव संपन्‍न करते. ज्‍यामुळे विद्यार्थ्यांना विविध पैलूंचे ज्ञान मिळते आणि जागतिक व्यवसाय क्षेत्रामध्‍ये प्रगती करण्‍यास आवश्‍यक असलेली सीमेपलीकडील सांस्‍कृतिक क्षमता मिळवण्‍यास मदत होते. याव्‍यतिरिक्‍त करिअरमध्‍ये आमूलाग्र बदल करण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी ऑनलाइन एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम्‍स भौगोलिक सीमांपलीकडे त्‍यांचे व्‍यावसायिक नेटवर्क विस्‍तारित करण्‍याकरिता, जगभरातील उद्योग व्‍यावसायिक व विचारवंत प्रमुखांसोबत संबंध स्‍थापित करण्‍याकरिता अनुकूल व्‍यासपीठ देतात.

थोडक्‍यात, ऑनलाइन आणि ऑन-कॅम्‍पस एमबीए/पीजीडीएम प्रोग्रामसंदर्भात निवड वैयक्तिक स्थिती, प्राधान्‍यक्रम आणि करिअर उद्दीष्‍टांवर अवलंबून आहे. ऑन-कॅम्‍पस प्रोग्राम्‍स सर्वोत्तम अनुभव अद्वितीय नेटवर्किंग संधी देतात, तर ऑनलाइन प्रोग्राम्‍स स्थिरता, उपलब्‍धता व किफायतशीरपणा देतात. शेवटी दोन्‍ही पद्धती वैयक्तिक व व्‍यावसायिक विकासासाठी सर्वोत्तम मार्ग आहेत. जगभरातील महत्त्वाकांक्षी व्‍यवसाय प्रमुखांच्‍या विविध गरजांची पूर्तता करतात. ऑन-कॅम्‍पस प्रोग्रामच्‍या पारंपारिक पद्धतीची निवड करा किंवा सोईनुसार ऑनलाइन व्‍यासपीठाची निवड करा. एमबीए/पीजीडीएम प्रोग्रामचे शिक्षण तुमच्‍या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्‍यासाठी आणि व्यवसायाच्या डायनॅमिक क्षेत्रात तुमच्‍या सर्व क्षमतांना अनलॉक करण्‍यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

Whats_app_banner