Cancer Risk: डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ-cancer risk increasing rates of head and neck cancer know what experts advice ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cancer Risk: डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Cancer Risk: डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

May 02, 2024 09:43 PM IST

Health Care Tips: आजकाल कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. जाणून घ्या सविस्तर

Cancer Risk: डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
Cancer Risk: डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ (unsplash)

Head and Neck Cancer Risk: डोकं आणि मानचे स्क्वॅमस सेल कार्सिनोमाची जागतिक घटना वाढत आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे ग्लोबोकन म्हणजेच 'कॅन्सरसाठी आंतरराष्ट्रीय एजन्सीची जागतिक कर्करोग वेधशाळा संशोधना' मध्ये अनेक देशांमधील तरुण लोकसंख्येमध्ये २०३० पर्यंत वार्षिक ३०% वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे . भारतात डोकं आणि मानेच्या कर्करोगाचा ३०% वाटा कर्करोगाच्या ओझ्यामध्ये आहे, जो ग्लोबोकनच्या नुसार २१ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. २०२० च्या तुलनेत यामध्ये ५७.५% वाढ झाली आहे. पुण्याशोक हेड अँड नेक इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, माजी प्रा. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे हेड अँड नेक सर्जन डॉ. प्रथमेश. एस. पै यांनी डोकं आणि मानेच्या कर्करोगाचा धोका कसा वाढतोय याबद्दल सांगितले.

नऊ भारतीयांपैकी एकाला कर्करोग होण्याचा जीवनभर धोका असतो आणि बहुतेक तो टाळता येण्याजोगा असतो. स्क्वॅमस सेल कर्करोग हे सर्वात सामान्य कर्करोग आहेत आणि हे ८०% तंबाखू, सुपारी आणि दारूच्या सेवनामुळे होतात. कर्करोग लक्षण दिसून येण्यासाठी ८ ते १० वर्षे लागतात. परंतू तंबाखू, सुपारी आणि दारूच्या सेवनाच्या सवयी टाळून प्रतिबंध करता येतो.

हे विरोधाभासात्मक आहे की तोंडाचा कर्करोग, ज्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे, तो दृश्य तपासणीवरच आढळून येतो आणि तरीही आजच्या युगातही त्याच्या निदानास सरासरी ६ महिने विलंब होतो. त्यामुळे बहुतेक कॅन्सर प्रगत अवस्थेत आढळून येतात, ज्यांना मल्टीमोडल उपचारांची आवश्यकता असते. ज्यामुळे टॉक्सीसिटी आणि खर्च दोन्ही वाढतात. इतके तीव्र उपचार असूनही यापैकी जवळपास ५०% रुग्ण पहिल्या वर्षीच दगावतील.

काय करावे ?

डोके आणि मानेच्या कर्करोगाच्या घटना कमी करण्यासाठी सरकार तसेच वैयक्तिक नागरिकांकडून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. दशकानंतर कर्करोगाच्या आणखी घटना रोखण्यासाठी तरुणांमध्ये तंबाखू आणि सुपारी यांच्या वापरावर बंदी घालण्याची गरज आहे. आपण आरोग्य शिक्षण आणि जागरूकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्यात लवकर निदान, सुलभ उपचारांची तीव्रता आणि खर्च दोन्ही कमी असेल.

या गोष्टींकडे द्या लक्ष

ओरल कॅविटीची कोणतीही वाढ, हिरड्यांमधून कोणताही असामान्य रक्तस्त्राव, गिळताना कोणताही बदल, आवाजात कोणताही बदल, मानेतील कोणतीही वाढ यासारख्या चिन्हे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करण्याची गरज आहे. तोंडाच्या आतील भागाची स्वच्छता आणि दातांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्यावर भर दिला गेला पाहिजे. तसेच आपण वर्षातून किमान दोनदा तपासणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांना दिवसातून दोनदा दात घासण्याचे आणि तोंडाची स्वच्छता राखण्याचे आरोग्यविषयक फायदे शिकवले पाहिजेत. डोके आणि मानेचे कर्करोग टाळता येण्यासारखे आहेत, आपण त्यावर काम केले पाहिजे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग