Cancer Awareness : औषधांसोबत आपल्या माणसाची काळजीही आवश्यक! ‘मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर’शी कसे कराल दोन हात?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cancer Awareness : औषधांसोबत आपल्या माणसाची काळजीही आवश्यक! ‘मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर’शी कसे कराल दोन हात?

Cancer Awareness : औषधांसोबत आपल्या माणसाची काळजीही आवश्यक! ‘मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर’शी कसे कराल दोन हात?

Nov 06, 2024 09:33 PM IST

Cancer Awareness care :मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरचा सामना केलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या प्रवासामधून जीवन, कुटुंब व समुदायांवर या आजाराच्‍या परिणामाची आठवण होते.

Cancer Awareness care
Cancer Awareness care

Cancer Awareness care : भारतात, स्‍तनाचा कर्करोग हा सर्वात जास्त निदान होणारा कर्करोग आहे. आपल्‍यापैकी बहुतेकजण अशा व्‍यक्‍तींना ओळखतात, ज्‍यांनी स्‍तनाचा कर्करोगाविरोधातील आव्‍हानात्‍मक संघर्षाचा सामना केला आहे. कुटुंबातील सदस्‍य, मित्रमैत्रिण किंवा सहकारी असो, त्‍यांचे अनुभव या आजाराच्‍या घातक वास्‍तविकतेची जाणीव करून देतात. मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरचा सामना केलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या प्रवासामधून जीवन, कुटुंब व समुदायांवर या आजाराच्‍या परिणामाची आठवण होते, ज्‍यामुळे या आजाराबाबत जागरूकता व पाठिंब्‍याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने दिसून येते. 

मेडिकल ऑन्‍कोलॉजीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. तुषार पाटील म्हणतात की, ‘वर्षानुवर्षे मी निरीक्षण केले आहे की, जवळपास ३० टक्‍के रूग्‍ण मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरच्‍या लक्षणांबाबत समज व गैरसमजांना बळी पडतात. रूग्‍ण व केअरगिव्‍हर्सनी उपचार पर्याय व निष्‍पत्तींबाबत अर्थपूर्ण संवाद साधणे, तसेच मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह जगण्‍याच्‍या गुंतागुंतींमधून नेव्हिगेट करणे महत्त्वाचे आहे. केमोथेरपीपासून प्रगत उपचार पर्यायांपर्यंत जोखीम घटक आणि मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरच्‍या व्‍यवस्‍थापनामधील अद्वितीय आव्‍हानांबाबत माहीत असले पाहिजे. रूग्‍णांनी अचूक माहितीसह स्‍वत:ला खंबीर केले पाहिजे आणि योग्‍य उपचार योजनेची निवड केली पाहिजे, जी त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा व जीव वाचण्‍याची शक्‍यता सुधारेल. मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत पाच समज आहेत.     

खाली काही टिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत करू शकतात: 

निदानाबाबत जाणून घ्‍या: आजाराबाबत अधिक उत्तमपणे जाणून घेण्‍यासाठी हेल्‍थकेअर टीमसोबत खुल्‍या मनाने सल्‍लामसलत करा, शंका विचारा. प्रगत थेरपीजसह सर्व उपचार पर्यायांचा शोध घ्‍या आणि संभाव्‍य प्रति‍कूल परिणामांबाबत जाणून घ्‍या.

सर्वोत्तम उपचाराची निवड करा: मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसाठी प्रत्‍येक थेरपी उपचाराचे स्‍वत:चे प्रतिकूल परिणाम असतात. पण, लक्ष्यित थेरपीज व इम्‍यूनोथेरपीसह उपचार पर्यायांमध्‍ये सुधारणा होण्‍यासह रूग्‍णांना अधिक पर्याय उपलब्‍ध आहेत. तुमच्‍यासाठी योग्‍य असलेल्‍या उपचार पर्यायांबाबत डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. 

Cancer Awareness Day: WHO च्या रिपोर्टनुसार 'या' ६ कॅन्सरमुळे होतात सर्वाधिक मृत्यू, जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

सपोर्ट सिस्‍टम तयार करा: जिवलग कुटुंबिय व मित्रांना निदानाबाबत सांगा, कारण त्‍यांच्‍या पाठिंब्‍यामुळे तुम्‍हाला उपचार प्रवासादरम्‍यान स्थिरता निर्माण होण्‍यास मदत होईल. तसेच, अशाच आव्‍हानांचा सामना करत असलेल्‍या इतर व्‍यक्‍तींशी कनेक्‍ट होण्‍याकरिता स्‍थानिक सपोर्ट ग्रुप्‍स किंवा ऑनलाइन समुदायांमध्‍ये सामील व्‍हा. अनुभवांची देवाणघेवाण केल्‍याने बहुमूल्‍य माहिती मिळू शकते आणि भावनिक ताण कमी होण्‍यास मदत होऊ शकते. 

एकूण आरोग्‍यावर लक्ष केंद्रित करा: कर्करोगावरील उपचाराच्‍या प्रवासादरम्‍यान सं‍तुलित आहार, नियमित व्‍यायाम आणि पुरेशी झोप यासह आरोग्‍यदायी जीवनशैली राखण्‍यासाठी स्‍वत:ची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या. चिंतन किंवा योग यासारख्‍या तणाव दूर करणाऱ्या तंत्रांचा अवलंब करा आणि आरामदायीपणा व उत्‍साह देणारे क्रियाकलाप करण्‍यासाठी वेळ काढा, ज्‍यामुळे भावनिक व शारीरिक स्‍वास्‍थ्‍य उत्तम राहण्‍यास मदत होईल. 

आर्थिक नियोजन: उपचारासाठी होणारा खर्च जाणून घेण्‍यासोबत आर्थिक सहाय्यक पर्यायांचा शोध घेण्‍यासाठी डॉक्‍टर्स व विमा प्रदात्‍यांसोबत सल्‍लामसलत करा. तसेच, परिवहन ते अपॉइण्‍ट्समेंट्स, चाइल्‍डकेअर गरजा आणि कामाच्‍या स्थितीनुसार कोणतेही आवश्‍यक समायोजन अशा व्‍यावहारिक घटकांचा विचार करा.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner