Viral Brain Teaser Challenge: ब्रेन टीझर्स हे फार इंटरेस्टिंग कोडी असतात. याला सोडवण्यासाठी आपल्याला आपले गणित आणि तर्क कौशल्य वापरण्याची आवश्यकता असते. हे सोडविणे मजेदारही असते. काही कोडे आपल्याला पटकन सोडवता येतात तर काहींसाठी खूप डोके फोडी करावी लागते. जर तुम्हाला असे प्रश्न सोडवायला आवडत असतील तर आमच्याकडे तुमच्यासाठी परफेक्ट ब्रेन टीझर आहे.हे ब्रेन टीझर @battlepromms हँडलवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "खाली दिलेल्या क्रमांकांपुढे कोणता क्रमांक येतो? २ ४ ८ १० २०?" काय वाटतं तुम्हाला हे कोडं तुम्ही सोडवू शकाल का?
ही पोस्ट काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला असंख्य लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये आपली उत्तरंही शेअर केली आहेत. काहींनी योग्य उत्तर "४४" असे म्हटले, तर काहींनी "४०" असे म्हटले. या कोड्याचं नक्की उत्तर काय आहे असं तुम्हाला वाटतं?
याआधी अजून एक ब्रेनटीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात लिहिलं होतं की, "जर एन्ट्रीला (ENTRY)१२३४५ आणि एसटीआयडीला (STEADY) ९३१७८५ म्हणून कोड केले गेले असेल तर TENANT ला काय नंबर येतील?" आपण हे सोडवू शकाल असे आपल्याला वाटते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.