Skin Care: चेहऱ्यावर महिनाभर कोरफडीचे जेल लावले तर काय होते? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: चेहऱ्यावर महिनाभर कोरफडीचे जेल लावले तर काय होते? जाणून घ्या

Skin Care: चेहऱ्यावर महिनाभर कोरफडीचे जेल लावले तर काय होते? जाणून घ्या

Published Dec 28, 2023 02:29 PM IST

Aloe vera gel benefits for skin: कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याचा स्किन केअर रुटीनमध्ये आवर्जून सहभाग करावा.

Can we apply aloe vera on face daily
Can we apply aloe vera on face daily (Unsplash)

Is aloe vera gel good for face everyday: आपली त्वचा ऊत्तम ठेवण्यासाठी स्किन केअर केलं पाहिजेत. स्किन केअरसाठी आपण अनेक प्रकारची स्किन प्रॉडक्टस आणि उपायांचा अवलंब करतो. या उपायांपैकीच एक म्हणजे कोरफडीचे जेल त्वचेवर लावणे. कोरफड हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीत, बरेच लोक दररोज त्यांच्या चेहऱ्यावर कोरफड वेरा जेल लावतात. ते लावल्यानंतर काही दिवसातच चेहऱ्यावर बदल दिसू लागतात. कोरफडीचे जेल महिनाभर रोज लावल्यास चेहऱ्यावर काय परिणाम होतात याबद्दल जाणून घ्या.

त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो

कोरफड जेल वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या जसे की डाग, सुरकुत्या आणि सूर्यप्रकाशापासून आराम मिळू शकतो. हे त्वचेवर खाज सुटणे आणि सूज येण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.

हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन

कोरफड वेरा जेल त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझ करण्यात मदत करू शकते. त्यामुळे ज्या लोकांची त्वचा हिवाळ्यात कोरडी होते त्यांनी ते चेहऱ्यावर लावावे. यासोबतच ते लावल्याने त्वचा हायड्रेट राहते.

मृत त्वचा पेशी

कोरफडीचं जेल दररोज चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या मृत पेशी दूर होण्यास मदत होते. महिनाभर एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा निरोगी राहते.

या गोष्टींची काळजी घ्या

पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही लोकांची त्वचा संवेदनशील असू शकते त्याला कोरफडीचा गर सहन होणार नाही. काही लोकांना कोरफडीची ऍलर्जी असू शकते. त्यामुळे सुरुवातीला एलोवेरा जेल थोड्या प्रमाणात किंवा फक्त हातांच्या त्वचेवर लावा. जर ते तुम्हाला अनुकूल असेल तरच चेहऱ्यावर लावा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या वाटत असल्यास ते वापरू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner