Calcium: कॅल्शियमची कमतरता फक्त दूधच नाही तर या भाज्याही करतात पूर्ण!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Calcium: कॅल्शियमची कमतरता फक्त दूधच नाही तर या भाज्याही करतात पूर्ण!

Calcium: कॅल्शियमची कमतरता फक्त दूधच नाही तर या भाज्याही करतात पूर्ण!

Dec 06, 2023 10:58 AM IST

Calcium Deficiency: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेकप्रकारच्या समस्या होतात. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात काही भाज्या समाविष्ट करा.

Health Care
Health Care (Freepik)

Calcium food: कॅल्शियम हे शरीरातील सर्वात मुबलक खनिजच नाही तर आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे. कॅल्शियमची कमतरता टाळण्यासाठी आणि राखण्यासाठी, तुम्ही दुग्धजन्य पदार्थ (कॅल्शियम युक्त भाज्या) तसेच हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहारात समाविष्ट करून त्याची भरपाई करू शकता. तर आज आम्ही त्या 5 हिरव्या भाज्यांबद्दल सांगणार आहोत.

कोणत्या भाज्यांमध्ये असते कॅल्शियम ?

सरसों साग

सलगम

काळे

ब्रोकोली

स्विस चार्ड

ओवा पाने

रताळी

कोबी

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होणे, स्नायू दुखणे, कमकुवत दात येणे, झोपायला त्रास होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, बद्धकोष्ठता, गॅस व पोटदुखी, नखं तुटणे असे त्रास होतात. यामुळे तणाव कायम राहतो.

आपल्याला दररोज किती कॅल्शियम आवश्यक आहे?

हार्वर्ड हेल्थच्या मते, १९ ते ५० वयोगटातील महिलांनी दररोज १००० मिलीग्राम घ्यावे.

कमतरतेचे कारण काय?

कमतरतेचे कारण म्हणजे कॅल्शियम फूडचे सेवन न करणे आणि दुसरे म्हणजे जे लोक जास्त प्रमाणात मद्य आणि कॅफिनचे सेवन करतात त्यांना कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner