मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Budget Travel: भारतातील 'या' ठिकाणांना द्या भेट, तुम्हाला येईल युरोपचा अनुभव

Budget Travel: भारतातील 'या' ठिकाणांना द्या भेट, तुम्हाला येईल युरोपचा अनुभव

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 06, 2022 11:54 AM IST

Foreign Travel: तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा लूक युरोप सारखाच आहे.

ट्रॅव्हल टिप्स
ट्रॅव्हल टिप्स (Unsplash)

युरोपमध्ये ५० हून अधिक देश आहेत आणि त्यांच्या बहुतेक सीमा आशियाशी जोडलेल्या आहेत. इतकेच नाही तर युरोप आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. बरेचदा लोक सुट्टी घालवण्यासाठी युरोपला जातात. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा लूक युरोप सारखाच आहे. अशा ठिकाणी भेट देऊन तुम्ही युरोप टूरसारखा आनंद भारतातच लुटू शकाल.

फॉन्टेनहास

तुम्हाला भारतात युरोपला भेट देण्याचा फील घेयचा असेल तर तुम्ही फॉन्टेनहासला नक्की जा. येथील घरे युरोपियन शैलीत बांधण्यात आली आहेत. घराच्या भिंतींचा रंग अगदी युरोपातील देशांसारखा आहे. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते फॉन्टेनहास हे अंतर २५ किलोमीटरवर आहे.

लक्षद्वीप

लक्षद्वीप भारतातही सुंदर ठिकाण आहे. भारतात असूनही ते फ्रेंच पॉलिनेशियासारखे दिसते. जर तुम्ही फ्रेंच पॉलिनेशियाला भेट देण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही जास्त खर्च न करता लक्षद्वीपची ट्रिप प्लॅन करू शकता.

काश्मीर

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. काश्मीरमध्ये असलेले ट्यूलिप गार्डन आणि दल सरोवर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. काश्मीरमध्ये भेट देण्याची प्रमुख ठिकाणे म्हणजे श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग, दचीगाम राष्ट्रीय उद्यान इ. हिवाळ्यात पडणारा बर्फ तुम्हाला इथे युरोपचा अनुभव देईल.

नाशिक

नाशिक हे पवित्र आणि धार्मिक स्थळ आहे. तब्बल १२ वर्षांनंतर येथे कुंभमेळा भरतो. नाशिकमधील प्रमुख ठिकाणे म्हणजे शिर्डी, सोमेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, सुंदरनारायण मंदिर, पंचवटी. या शहराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तुम्ही येथे अवश्य भेट द्या.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग