मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Buddhist Temples: भारतात प्रसिद्ध आहेत ही बौद्ध मंदिरे आणि मठ, लोकांची असते नेहमी गर्दी

Buddhist Temples: भारतात प्रसिद्ध आहेत ही बौद्ध मंदिरे आणि मठ, लोकांची असते नेहमी गर्दी

May 22, 2024 11:57 PM IST

Buddha Purnima 2024 Special: भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या यादीमध्ये बौद्ध मंदिरे देखील समाविष्ट आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या मंदिरांबद्दल जाणून घ्या.

बुद्ध पौर्णिमा - भारतातील प्रसिद्ध बौद्ध मंदिरे आणि मठ
बुद्ध पौर्णिमा - भारतातील प्रसिद्ध बौद्ध मंदिरे आणि मठ (unsplash)

Famous Buddhist Temples and Monasteries in India: भारतात अनेक मंदिरे आहेत, जी विविध धर्मांची आहेत. बौद्ध मंदिरे आणि मठांबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात काही मंदिरे आणि मठ आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत. या मंदिरांना भेट देण्यासाठी विविध ठिकाणांहून पर्यटक येतात. येथे नेहमीच पर्यटक, लोकांची गर्दी पहायला मिळते. २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या विशेष प्रसंगी भारतातील प्रसिद्ध बौद्ध मंदिरे आणि मठांबद्दल जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

१. महाबोधी मंदिर, बोधगया

बिहारच्या बोधगया शहरात स्थित महाबोधी मंदिर हे बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. हे भारतातील प्रसिद्ध बौद्ध मंदिर आहे, जिथे गौतम बुद्धांनी प्रसिद्ध बोधीवृक्षाखाली बसून ज्ञानप्राप्ती केली होती.

२. महापरिनिर्वाण मंदिर, कुशीनगर

कुशीनगर, उत्तर प्रदेश येथे स्थित महापरिनिर्वाण मंदिरात विराजमान बुद्धाची ६ मीटर उंच मूर्ती आहे. ही मूर्ती गौतम बुद्धांच्या शेवटच्या स्थितीचे चित्रण करते आणि ते भारतातील प्रसिद्ध बौद्ध मंदिरांपैकी एक बनवते.

३. माइंड्रोलिंग मठ, डेहराडून

माइंड्रोलिंग मठ हे भारतातील बौद्धांसाठी सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या मठातील बुद्ध मंदिर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मठात भगवान बुद्धांच्या सर्वात सुंदर आणि उंच मूर्ती आहेत.

४. घुम मठ, दार्जिलिंग

दार्जिलिंगमधील पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले, घूम मठ हे तिबेटी बौद्ध मठांपैकी एक आहे. त्यात मैत्रेय बुद्धाची १५ फूट उंचीची मूर्ती आहे. हे प्रसिद्ध मठांपैकी एक मानले जाते.

५. त्सुगलगखांग मंदिर, धर्मशाळा

हे मंदिर धर्मशाळेतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर परिसर दलाई लामा यांचे अधिकृत निवासस्थान आहे. या मंदिर परिसरात प्रसिद्ध कालचक्र मंदिर देखील आहे.

६. धमेख स्तूप, सारनाथ

धमेख स्तूप सारनाथमधील एक मोठा बौद्ध स्तूप आहे. हे ते ठिकाण आहे जिथे बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश केला. हे ठिकाण बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी एकमहत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel