मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Honeymoon Essentials: उन्हाळ्यात लग्न करताय? हनिमूनला जाताना या गोष्टी सोबत घ्यायला विसरू नका

Honeymoon Essentials: उन्हाळ्यात लग्न करताय? हनिमूनला जाताना या गोष्टी सोबत घ्यायला विसरू नका

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 24, 2023 10:38 PM IST

Summer Wedding Tips : उन्हाळ्यात लग्न असेल तर हनिमूनसाठी अनेक जण डोंगरावर किंवा बीचवर जातात. तुम्ही सुद्धा असे काही प्लॅन करत असाल तर नवीन नवरीने हनिमूनसाठी या गोष्टी जरूर ठेवाव्या.

उन्हाळ्यात हनिमूनला जाताना सोबत घ्यायच्या आवश्यक गोष्टी
उन्हाळ्यात हनिमूनला जाताना सोबत घ्यायच्या आवश्यक गोष्टी

Honeymoon Essential Things For Bride: जर तुम्ही उन्हाळ्यात लग्न करत असाल तर तुमच्याकडे हनिमूनला जाण्यासाठी अनेक ऑप्शन आहेत. तुम्ही एखाद्या बीच वर जाऊ शकता किंवा एखाद्या हिल स्टेशनवरही जाऊ शकता. हा काळ नवीन कपलसाठी खूप खास असतो. मात्र, लग्नाच्या तयारीत मुलीला तिची हनिमूनची पॅकिंग करण्यासाठी वेळ मिळत नाही. किंवा ते त्यांच्यासाठी सर्वात शेवटचे काम बनते, ज्यामुळे घाई गडबडीत बऱ्याच गोष्टी पॅक करायच्या राहून जातात. तुमच्यासाठी हे सोपे करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवाव्या.

कलरफुल मॅक्सी ड्रेस

हनिमून कुठेही असो, बीच असो किंवा पर्वत, पण मॅक्सी ड्रेस सर्वत्र सुंदर दिसेल. तुमच्या हनिमूनला एक सुंदर आणि कम्फर्टेबल मॅक्सी ड्रेस असणे आवश्यक असावी, विशेषतः जर तुमचे लग्न उन्हाळ्यात होत असेल. बॅकलेस किंवा स्ट्रॅपी घेऊ शकता आणि ते सुंदर सँडलसह पेअर करू शकता.

एक मोठी कॅप

सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी मोठी टोपी किंवा कॅप योग्य आहे. बीचवर टॅनिंगचा आनंद घेताना तुम्ही तुमचा चेहरा टोपीने झाकून तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करू शकता.

एक मोठी हँडबॅग

घेऊन जाणाऱ्या सामानाचा विषय येतो तेव्हा टोपीसारखी मोठी हँडबॅग देखील आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या हॉटेलच्या खोलीपासून बीचपर्यंत सामान नेण्यासाठी याचा वापर करू शकता. यात तुम्ही कॅमेरा, सनस्क्रीन, कपडे, पर्स आणि बरेच आवश्यक सामान ठेवू शकता.

हाय एसपीएसह लिप ग्लॉस, मस्करा आणि मॉइश्चरायझर

या दिवसांमध्ये चांगले दिसण्यासाठी तुम्हाला तासन् तास आणि भरपूर मेकअप करण्याची गरज नाही. प्रत्येकाला सुंदर दिसायला आणि फील करायला आवडते. हलक्या रंगाचा लिप स्टेनर, चांगला वॉटरप्रूफ मस्करा आणि हाय एसपीएफ असलेले मॉइश्चरायझर ठेवा.

बिकनी

बीचवर बिकनी घेऊन जाणे आवश्यक आहे. जरी तुम्ही हिल स्टेशनवर जात असाल तरीही हे सोबत ठेवा. हॉटेल पूल येथे शांत दुपारसाठी सर्वोत्तम आहे. त्यात फोटो क्लिक करायला विसरू नका.

स्टेटमेंट नेकलेस आणि गॉगल्स

ते कोणत्याही साध्या ड्रेसचे एका झटक्यात रूपांतर आणि अपडेट करू शकतात. मिक्स अँड मॅच करा आणि आपल्या ड्रेसिंगसह मजा घ्या.

सँडल आणि फ्लिपफ्लॉप

आपल्या हनिमूनला स्टाइलवर कम्फर्ट निवडा. जोपर्यंत डिनर नाइट किंवा क्लबला जायचे नसेल तोपर्यंत हील्स कमीच घाला.

आवश्यक कागदपत्र

तुमचे पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, इतर ओळखपत्र यांची फोटोकॉपी सोबत ठेवा. याशिवाय तुमचे ओरिजनल कागदपत्र सिलबंद पाउचमध्ये ठेवा, म्हणजे हरवणार नाही. तसेच तुमच्या होटलचा पत्ता, नंबर सुद्धा सोबत ठेवा.

मेडिसिन किट

सर्व प्रकारचे औषधे जवळ ठेवा. तुम्ही जात आहे तेथील वातावरण, जेवण तुम्हाला सूट करेल की नाही हे तुम्हाला माहित नसते. तुमच्याजवळ डोकेदुखी पासून पायाला मोच आणि गर्भनिरोधक पासून सॅनिटरी नॅपकिन्सपर्यंत सर्व सोबत ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग