Skin Care Tips for Bridal: यंदा जुलै महिन्यात लग्नाचा सीझन आहे. लग्नासाठी नवरी प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेत असते. लग्नाच्या दिवशी खास मेकअप करण्यासोबतच ती आपल्या स्किन केअरची सुद्धा विशेष काळजी घेते. पावसाळ्यात नवरीला आपल्या स्किन केअरची चिंता सतावत असते. याचे कारण म्हणजे चिकट, दमट, उष्णतेचे वातावरण आहे. ज्यामुळे चेहरा एकदम निस्तेज दिसू लागतो आणि सर्व मेकअपही निघून जातो. जर तुम्हाला नॅचरल ब्युटिफुल ब्राईड दिसायचे असेल जी मेकअप शिवाय सुद्धा सुंदर दिसेल तर या स्किन केअर टिप्स फॉलो करायला विसरू नका. पावसाळ्यात लग्न असणाऱ्या मुलींसाठी या स्किन केअर टिप्स उपयुक्त आहेत.
चेहऱ्यावर मुरुम आणि पिंपल्स सारखी समस्या असेल तर कडुनिंबाच्या फेस क्लिंजरचा वापर करा. जेणेकरून आतील सर्व छिद्रे साफ होतील आणि चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल देखील निघून जाईल.
रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल त्वचेवर लावायला विसरू नका. यामुळे त्वचेचे अनेक डाग दूर होऊन त्वचा चमकदार होण्यास मदत होते. यासोबतच छोटे मुरुमही लगेच दूर होतात.
फेस वॉश केल्यानंतर त्वचेवर लाइट मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून त्वचा आतून मॉइश्चरायझ होईल. बाजारात बरेच प्रोडक्ट आहेत परंतु ऑर्गेनिक उत्पादन वापरा. जे त्वचेवर हानिकारक नसते.
जर तुम्ही पार्लरमधून ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली असेल तर फक्त स्किन क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगवर लक्ष केंद्रित करा. याशिवाय कोणतेही नवीन प्रोडक्ट ट्राय करू नका. सनस्क्रीन लावायला विसरू नका.
दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवा. सकाळी बाहेरून आल्यावर फेस वॉशने चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. दररोज त्वचेचे हे रूटीन फॉलो करत राहा.
भरपूर पाणी प्या आणि बाजारातील अनहेल्दी गोष्टी पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून त्वचेवर पिंपल्स येणार नाही. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास घाम येऊनही चेहऱ्यावर चमक कायम राहील आणि नवरीच्या चेहऱ्याची चमक रोज दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या