मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bridal Tips: लग्नापूर्वी चेहऱ्यावर चमक आणायची? मग हा ज्यूस प्यायला नक्की सुरुवात करा

Bridal Tips: लग्नापूर्वी चेहऱ्यावर चमक आणायची? मग हा ज्यूस प्यायला नक्की सुरुवात करा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 20, 2024 06:38 PM IST

Bridal Tips: लग्नाआधी प्रत्येक मुलीला आपली त्वचा चमकदार हवी असते. पण त्यासाठी केवळ महागड्या क्रिम वापरणे, फेशिअल करणे पुरे नसते. त्यामुळे चमकदार त्वचेसाठी नेमकं काय करावं जाणून घ्या...

Magical juice for bridal glow and pinkish skin
Magical juice for bridal glow and pinkish skin (Shutterstock)

लग्नाआधी मुली त्वचेची विशेष काळजी घेताना दिसतात. लग्नात चेहऱ्यावर ग्लो यावा यासाठी विविध प्रकारचे महागडे फेशिअल, क्रीम, फेस मास्क आणि इतर सौंदर्य प्रसादनांचा वापर त्या करताना दिसतात. या सगळ्यामुळे चेहऱ्यावर चमक येते पण ती काही दिवसच टिकते. अनेकदा या रसायनांच्या दुष्परिणामांमुळे चेहरा अधिक खराब देखील होतो. आज आम्ही तुम्हाला असा जादुई ज्यूस सांगणार आहोत की लग्नाच्या काही दिवस आधी जर तुम्ही त्याचा आपल्या आहारात समावेश केला तर तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकेल. हा रस त्वचेला आतून सुधारण्याचे काम करतो. चला तर मग पाहूया त्याची सोपी रेसिपी.
वाचा : पावसाळ्यात काही चमचमीत खायची इच्छा झालीये? मग बनवा अगदी सोपे आणि चवदार चीज कॉर्न कटलेट

कसा बनवावा हा ज्यूस?

हा जादुई रस बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा कप बीटरूट, अर्धा कप गाजर, एक सफरचंद, अर्धा इंच कच्ची हळद, एक आवळा आणि एक कप डाळिंब लागेल. आपल्याकडे यापैकी कोणतीही गोष्ट नसली तरीही आपण त्याशिवाय हा रस तयार करू शकता. परंतू हा रस पिण्याचे टाळू नका. ही सगळी फळे बारीक कापा आणि ब्लेंडरमध्ये टाका. हवे असल्यास चवी पुरता थोडे मध तुम्ही घालू शकता. पण इतर पदार्थ मिसळणे टाळा. या रसामुळे शरीराल भरपूर फायबर देखील मिळेल जे पोटासाठी देखील चांगले आहे.
वाचा : दिलजीत दोसांजच्या हिरेजडीत घड्याळाची चर्चा, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही

काय आहेत या ज्यूसचे फायदे?

जर तुम्ही या रसाचे नियमित सेवन केले तर तुमच्या चेहऱ्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर चमक येते. हा रस अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे.त्यामुळे त्वचा मुलायम आणि तरुण ठेवण्यासही मदत होते. काही दिवस या ज्यूसचे सेवन केले तर त्वचा पूर्वीपेक्षा अधिक चमकदार आणि गोरी होते. चेहऱ्यावर एक गुलाबी चमक येते. शरीरातील रक्ताबरोबरच काही आवश्यक पोषक तत्वांची कमतरताही पूर्ण होते. केसांच्या वाढीतही फायदा होतो.
वाचा : दुधी भोपळ्यापासून घरच्या घरी बनवा पनीर, जाणून घ्या सोपी रेसिपी

ट्रेंडिंग न्यूज

लग्नापूर्वी मुलींनी हा ज्यूस तीन ते चार आठवडे नियमीत घेतल्याने चेहऱ्यावर चमक येते असे म्हटले जाते. चेहऱ्यासोबत शरीराची संपूर्ण त्वचा चमकदार होते. त्यामुळ वधूंनी हा ज्यूस नक्की ट्राय करुन पाहावा..

WhatsApp channel