Breastfeeding Week: बाळाचं नीट पोट भरत नाही, ब्रेस्टमधून दूधच येत नाही?आईने करावे 'हे' उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breastfeeding Week: बाळाचं नीट पोट भरत नाही, ब्रेस्टमधून दूधच येत नाही?आईने करावे 'हे' उपाय

Breastfeeding Week: बाळाचं नीट पोट भरत नाही, ब्रेस्टमधून दूधच येत नाही?आईने करावे 'हे' उपाय

Published Aug 02, 2024 02:04 PM IST

Breastfeeding Week 2024: नव्याने आई बनलेल्या स्त्रियांना अनेक अडचणी येत असतात. या स्त्रियांना आपल्या मुलांचं पोट भरणे हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. कारण जन्मलेल्या मुलांना आईच दूध हेच त्याच पोषण असतं.

World Breastfeeding Week 2024
World Breastfeeding Week 2024 (Freepik)

Breastfeeding Week 2024: १ ऑगस्टपासून ७ ऑगस्टपर्यंत हा संपूर्ण आठवडा 'वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक' म्हणून साजरा केला जात आहे. आई होणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. आईपण ही भावना प्रत्येक स्त्रीसाठी काही वेगळीच असते. पण आई होणे ही गोष्ट जितकी आनंदाची असते, तितकीच ती जबाबदारीचीदेखील असते. आईला आपल्या मुलाच्या बाबतीत प्रत्येक लहान-लहान गोष्टींबाबत लक्ष द्यावे लागते. अशातच नव्याने आई बनलेल्या स्त्रियांना अनेक अडचणी येत असतात. या स्त्रियांना आपल्या मुलांचं पोट भरणे हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. कारण जन्मलेल्या मुलांना आईच दूध हेच त्याच पोषण असतं. अशात त्याला योग्यरीत्या स्तनपान व्हावं हे गरजेचं आहे.

परंतु अनेकदा नवजात मुलांचं पोटच भरत नाही. अशात ती मुले सतत रडायला सुरुवात करतात. मुलांना शांत झोप लागावी त्यांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी यासाठी आपल्या मुलाचं पोट नीट भरतंय का? हे प्रत्येक आईने आवर्जून पाहायला हवे. बाळाला जन्म दिल्यानंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल घडून येतात. अशावेळी अनेक महिलांच्या स्तनातून दूधच बाहेर येत नाही. आणि आईकडून पुरेसे दूध न मिळाल्याने बाळाचे पोट भरत नाही. जर तुम्हीसुद्धा नव्या आई असाल आणि तुमच्यासोबतसुद्धा याच समस्या येत असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

स्तनपानाच्या स्थितीकडे लक्ष द्या

आईचे दूध वाढवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाची योग्य स्थिती. स्तनपान करताना, बाळाने स्तन नीट धरले आहे की नाही. निप्पल नीट बाळाच्या तोंडात आहेत कि नाही या गोष्टी आईने बारकाईने बघायला हव्या.

स्तन रिकामे करा

बऱ्याचदा बाळ एका स्तनातून थोडे दूध पितात आणि नंतर दुसऱ्या स्तनातून दूध पिण्यास सुरुवात करतात. यामुळे स्तनांमध्ये दुधाचा पुरवठाही कमी होतो. त्यामुळे लक्षात ठेवा की, प्रत्येक स्तनपानादरम्यान, मुलाने दुस-या स्तनातून दूध पिण्यापूर्वी एका स्तनातून दूध रिकामे केले पाहिजे. त्यामुळे दूध तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते.

ब्रेस्ट कॉम्प्रेशन

जेव्हा तुम्हाला असे वाटते की स्तनातून दूध कमी येत आहे, जे मुलासाठी पुरेसे नाही, तेव्हा स्तन दाबणे हा एक चांगला पर्याय आहे. स्तनपान करताना स्तन दाबण्याची ही पद्धत आहे. त्यामुळे दूध ग्रंथीवर दाब पडतो आणि दूध वेगाने वाहू लागते. जेणेकरून बाळाचे पोट भरते.

तणाव कमी करा

ज्या माता खूप ताण घेतात त्यांच्या स्तनांमध्ये दुधाचा पुरवठा कमी असणे स्वाभाविक आहे. वास्तविक थकवा आणि तणाव आईच्या दूध निर्माण करण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे नवोदित आईंनी ताणतणावातून स्वतःला दूर ठेवावे. मन आनंदी आणि उत्साही ठेवावे. जेणेकरून मुलांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते.

स्वतःला हायड्रेट ठेवा

आईच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल, तरीसुद्धा बाळाला पुरेसे दूध मिळत नाही. कारण दुधामध्ये ९० टक्के पाणीच असते. त्यामुळे दूध वाढवण्यासाठी तुम्ही जास्तीत-जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. अशाने तुम्ही डिहायड्रेट होणार नाही. आणि तुमचे दूधसुद्धा मुलाला अपुरे पडणार नाही.

Whats_app_banner