Breastfeeding Week 2024: बाळाला कितव्या महिन्यापर्यंत करावे स्तनपान, कधी करावे बंद? वाचा काय सांगतात तज्ज्ञ-breastfeeding week 2024 how many days should the baby be breastfed after birth ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breastfeeding Week 2024: बाळाला कितव्या महिन्यापर्यंत करावे स्तनपान, कधी करावे बंद? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

Breastfeeding Week 2024: बाळाला कितव्या महिन्यापर्यंत करावे स्तनपान, कधी करावे बंद? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

Aug 06, 2024 01:35 PM IST

Breastfeeding Week 2024: आईचे दूध मुलांसाठी सर्वोत्तम मानले जाते. आणि सर्व नवोदित आई झालेल्या स्त्रियांना स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो.

Breastfeeding Week 2024: बाळाला कितव्या महिन्यापर्यंत करावे स्तनपान
Breastfeeding Week 2024: बाळाला कितव्या महिन्यापर्यंत करावे स्तनपान (Pixabay)

Breastfeeding Week 2024: 'आई' होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात खास भावना असते. बाळाच्या जन्मानंतर आईवर अनेक जबाबदाऱ्या येतात. आईसुद्धा अगदी हसत या जबाबदाऱ्या पूर्ण करत असते. एखाद्या नवोदित आईवर सर्वात सर्वात मोठी जबाबदारी असते ती म्हणजे आपल्या बाळाची योग्य वाढ होतेय का? याकडे लक्ष देणे. नवजात बाळाच्या चांगल्या वाढीसाठी त्यांचे पोट भरणे आवश्यक असते. यासाठी आईचे दूधच महत्वाचे असते. आईने योग्यरीत्या स्तनपान केल्यास बाळाचे पोषण चांगले होते.

जवळपास आपल्या प्रत्येकालाच माहित आहे की, बाळाच्या जन्मानंतर आईचे दूध पाजणे खूप महत्वाचे आहे. आईचे दूध फक्त मुलांचे पोट भरण्यासाठी आवश्यक नाही, तर स्तनपानाने मुलांची वेगाने वाढ होण्यासही मदत होते. आईचे दूध मुलांसाठी सर्वोत्तम मानले जाते. आणि सर्व नवोदित आई झालेल्या स्त्रियांना स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक स्त्रिया आपल्या मुलांना ६ महिने स्तनपान देतात. तर अनेक स्त्रिया आपल्या मुलांना ३-४ वर्षांपर्यंत स्तनपान देत असतात. तर मुलांना कोणत्या महिन्यापर्यंत स्तनपान द्यावे? आणि कोणत्या महिन्यात स्तनपान बंद करावे? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

बाळाला किती दिवस करावे स्तनपान?

तज्ज्ञांच्या मते, बाळाच्या जन्माच्या १ तासाच्या आत स्तनपान सुरू केले पाहिजे. मूल जन्माला आल्यानंतर त्याला ६ महिने फक्त आईचेच दूध पाजावे. ६ महिन्यांपर्यंत मुलांना स्तनपानाशिवाय पाणी किंवा इतर काहीही देऊ नये. WHO अर्थातच 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गोनाएझेशन सुचवते की, मुलांना ६ महिने आईचे दूध पाजावे. यानंतर, त्यांना हळूहळू घन पदार्थांची ओळख करून द्यावी, ज्याला पूरक पदार्थ देखील म्हणतात. यासह, मुलांना २ वर्षांपर्यंत स्तनपान करता येते. पण सहा महिन्यांच्या आधीच स्तनपान करणे बंद करणे अत्यंत चुकीचे आहे.

बाळाला २ वर्षांपेक्षा अधिककाळ स्तनपान-

शिवाय तज्ज्ञांच्या मते,२ वर्षांनंतरही स्त्रिया आपल्या बाळाला पाहिजे तितका वेळ स्तनपान चालू ठेवू शकतात. बाळाला ५ वर्षांपर्यंत स्तनपान करूनही कोणतीही हानी होत नाही. परंतु त्यांना त्या वयानुसार आवश्यक असलेले पोषण तत्वे मिळत नाहीत. त्यामुळे आईने हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या मुलाने पुरेशा प्रमाणात निरोगी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केले पाहिजे. २ वर्षांनंतर जर मूल खूप जास्त आईचे दूध प्यायले आणि इतर पदार्थ खात नसेल तर ते मुलाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. अशा परिस्थितीत बाळाने आईच्या दुधाऐवजी आरोग्यदायी पदार्थ खावेत यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे त्याच्या वाढीचा वेग वाढू शकतो.

दिवसातून कितीवेळा करावे स्तनपान?

त्याचबरोबर तज्ज्ञ सांगतात की, पहिले ६ महिने मुलांना दिवसातून किमान ८ ते १२ वेळा स्तनपान द्यावे. आईचे दूध हे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. आणि त्यामुळे मुलांच्या शरीरात पुरेसे दूध सतत पोहोचत राहते. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, जर स्त्रिया कोणतेही औषध घेत असतील तर त्यांनी स्तनपान करू नये, परंतु तसे नाही. डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या सल्ल्याने औषधे घेत असलेल्या स्त्रियादेखील आपल्या मुलांना स्तनपान करू शकतात. आईच्या दुधाने मुलांची चांगली वाढ होते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग